Indian Organ Donation Day: राष्ट्रीय अवयवदान दिनी दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज
अवयवदानाबाबत आता नव्या दृष्टीकोनातून विचार करून पहा, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही अनेकांना देऊ शकता जीवनदान
Indian Organ Donation Day: जागतिक अवदान दिन (Organ Donation Day) 13 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जात असला तरीही भारतामध्ये अवयवदान दिन 27 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ग्रीन रिबन हे प्रतिक असल्याने राष्ट्रीय अवयवदान दिनाचं( Indian Organ Donation Day) औचित्य साधून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हिरव्या रंगाच्या रोषणाईमध्ये न्हाऊन निघालं होतं.अवयवदानाबात असलेले समज-गैरसमज दूर सारून समाजात जनजागृती करण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
प्रत्यारोपणाभावी सुमारे पाच लाखाहून अधिक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मृत्यू पश्चात आणि जीवंतपणीदेखील काही अवयवांचे दान करणं शक्य असते. यामुळे अनेकांना विविध स्वरूपात जीवनदान मिळू शकते. मग तुमच्यादेखील मनात अशाच प्रकारचे काही समज-गैरसमज असतील तर ते दूर करून आजच अवयवदानासाठी एक पाऊल पुढे या !
नेत्रदानानंतर पुढच्या जन्मी आंधळे व्हाल
नेत्रदान हे मृत्यूपश्चात केले जाते. यामध्ये डोळ्याचा विशिष्ट भाग काढला जातो. त्यामुळे नेत्रदान आणि पुढल्याजन्मीचं आंधळेपण याचा एकमेकांशी थेट काहीच संबंध नाही.
ब्रेनडेड व्यक्तींकडून अवदान करवणं म्हणजे त्यांना मारणं
ब्रेनडेड व्यक्तीमध्ये केवळ हृद्याची क्रिया सुरू असते. ब्रेनडेड अवस्थेमध्ये व्यक्ती असल्यास त्यांच्याकडून अधिकाधिक अवयवदान होऊ शकल्याची शक्यता असते.
अवयवदानामुळे अंतिम संस्कारांना वेळ लागतो
मृत्यूनंतर सुमारे 12-24 तासामध्ये अवयवदान केले जाऊ शकते. त्यामुळे त्याचा परिणाम अंतिमसंस्कारांच्या विधीवर किंवा वेळेवर होण्याची शक्यता नाही.
मृत्यूनंतर अवयवदानाचा खर्च कुटुंबातील व्यक्तींवर पडतो
अवयवदानाचा खर्च दात्यांच्या कुटूंबीयांकडून घेतला जात नाही. हा एक गैरसमज आहे. मृत्यूपश्चात आणि दात्याचे अवदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिमसंस्काराचा खर्च करावा लागतो.
अवयवदानासाठी विशिष्ट वयाची मर्यादा असते
अवयवदानासाठी विशिष्ट वयाची मर्यादा नसते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अवयवदानाचा निर्णय घेता येतो. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सार्यांना अवयवदान करता येऊ शकते. त्यासाठी काही विशिष्ट वैद्यकीय चाचण्यांची पुर्तता करून डॉक्टर अवयवदानाचा अंतिम निर्णय घेतात.
मृत्यूनंतर जसे अवयवदान केले जाते तसेच जीवंतपणी यकृतदान, किडनीदान, गर्भाशयाचे दान केले जाऊ शकते. पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती ब्रेनडेड व्यक्तिंमध्ये मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडं, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप यांचे दान करणं शक्य आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत आता नव्या दृष्टीकोनातून विचार करून पहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)