तुमची 8 तास झोप झाल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो? 'हे' असू शकते कारण
तुम्ही सर्व गोष्टी जरी वेळेवर करत असाल तरीही तुमची झोप पूर्ण होत नाही किंवा झोप झाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो का? यामागे नेमके काय कारण असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
तुम्ही सर्व गोष्टी जरी वेळेवर करत असाल तरीही तुमची झोप पूर्ण होत नाही किंवा झोप झाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो का? यामागे नेमके काय कारण असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? असे असेल तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. कारण शरीरात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता असल्याचे तुम्हाला झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो. याच बद्दल आम्ही आज तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये 'या' आरोग्य टिप्स घेतील तुमच्या आरोग्याची काळजी; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी)
प्रत्येक वेळी जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता असल्याचे सुचित करते. खासकरुन रक्त आणि ऑक्सिजनची कमरता दिसते. तसेच काही न्युट्रिशन्स सुद्धा तुमच्या शरीराला मिळणे आवश्यक असते.त्याचसोबत ब्लड प्रेशर कमी झाले किंवा वाढल्यास व्यक्तिला थकवा जाणवतो. ही लक्षण मधुमेह किंवा थायरॉइडची समस्या असलेल्यांमध्ये दिसून येतात. दीर्घकाळ ही समस्या तशीच राहिल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन बीपी, थायरॉइड आणि शुगर तपासून घ्या. तर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर पुढील काही गोष्टींवर लक्ष द्या.
- तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश करा. त्याचसोबत योग्य न्युट्रिशन्स सुद्धा घ्या. परंतु सातत्याने ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-रुटीन चेकअप करत रहा. बोन डेंसिटी, विटामिन बी-12, डी आणि हिमग्लोबीनच्या कमतरतेसंदर्भात जागृक रहा.
-अनहेल्थी फूड्स म्हणजेच आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर रहा.
-शरीरासह मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. तेव्हाच कुठे तुम्ही उत्तम आणि हेल्थी आरोग्य जगू शकता. -कॅल्शिअमची कमतरता असल्यास तुम्ही डेअरी प्रोडक्ट्ससह सनबाथ जरुर करा.(Benefits Of Daily Walking: आजारांपासून दूर रहायचे असेल तर दररोज चाला; होतील 'हे' महत्वाचे फायदे)
दरम्यान, काही वेळेस खास पद्धतीच्या चेकअपमध्ये सुद्धा काही गोष्ट स्पष्ट न झाल्यास थकव्यामागील कारण समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा विटामीन बी12 आणि विटामिन डी चा सुद्धा तपास करुन घ्या. कारण हे सुद्धा तुमच्या थकव्यामागील एक कारण असू शकते. गरजेच्या औषधांसह 20 मिनिटे तरी सकाळच्या उन्हात फिरा.