Pregnancy Tips: तुम्ही गरोदर आहात की नाही हे पाहण्यासाठी करून पाहा 'हे' घरगुती उपाय
ज्यात त्वरित तुमच्या सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना घेऊन तुम्ही गरोदर आहात की नाही हे कळते.
सेक्स जरी जोडप्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक गोष्ट असली तरीही त्यामुळे होणारी गर्भधारणा (Pregnant) ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. कारण यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते आणि एक नवा जीव स्त्रीच्या उदरात जन्म घेत असतो. असा वेळी अनेकदा सुरक्षित अंतर न बाळगल्यामुळे अनपेक्षितपणे गर्भधारणा होते आणि ज्याचे लवकर निदान न झाल्यामुळे स्त्रिया आय पील किंवा शस्त्रक्रियेद्वारे गर्भपात करतात. गर्भपात (Abortion) करणे ही प्रक्रिया निसर्गाच्या विरुद्ध असल्यामुळे याचा स्त्री च्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतो. यामुळे वेळीच तुम्ही गरोदर आहात की नाही हे कळणे गरजेचे आहे.
तुम्ही गरोदर आहात की नाही हे कळण्यासाठी सध्या बाजारात एक किट उपलब्ध आहे. ज्यात त्वरित तुमच्या सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना घेऊन तुम्ही गरोदर आहात की नाही हे कळते. मात्र जर ही किट तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही घरच्या घरी काही नैसर्गिक उपायांनी याची पडताळणी करू शकता. आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा सविस्तर
गरोदर आहात की नाही हे पाहण्यासाठी काय कराल?
1. साखर
वाटीमध्ये 1 टेबलस्पून साखर घ्या त्यामध्ये 1 टेबलस्पून सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना घाला थोडा वेळ वाट पहा. जर त्यात साखर विरघळली नाही आणि त्याच्या गुठड्या तयार झाल्या तर समजा गर्भधारणा झाली आहे.
2. मीठ
एका ग्लासात लघवीचा नमुना घ्या, त्यामध्ये एक किंवा दोन चिमूट मीठ घाला आणि कमीत कमी 3 मिनिटांसाठी निरीक्षण करा. मिठाची लाघवीसोबत प्रक्रिया होते आणि पांढऱ्या गुठळ्या तयार होतात आणि हे नक्कीच गर्भधारणेचे लक्षण असते. स्तनपान करणा-या महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम
3. साबण
वाटीमध्ये साबण ठेवा, साबणावर २ टेबलस्पून लघवीच्या नमुन्याचे घाला आणि निरीक्षण करा. जर साबणाचा रंग फिकट झाला आणि काही बुडबुडे दिसले तर गर्भधारणा झाल्याची शक्यता असते.
4. टूथपेस्ट
एका वाटीत 2 टेबलस्पून पांढ-या रंगाची टूथपेस्ट घ्या त्यामध्ये एक टेबलस्पून लघवीचा नमुना घाला, थोडा वेळ वाट बघा आणि निरीक्षण करा. जर गर्भधारणा झाली असेल तर टूथपेस्ट आणि लघवीची प्रक्रिया झाल्यास टूथपेस्टचा रंग बदलतो किंवा फिकट सुद्धा होऊ शकतो.
5. गहू आणि जव
वाटीमध्ये काही गहू आणि जव ठेवा, त्यामध्ये लघवीचा नमुना घाला आणि 2 दिवस वाट बघा. जर गव्हाला आणि जवाच्या बियाना अंकुर फुटले तर तुम्ही गरोदर आहात. जर अंकुर फुटले नाहीत तर गर्भधारणा झालेली नसते.
या पद्धती 100% अचूक असतातच असे नाही. मात्र ताबडबोत घरगुती उपाय म्हणून तुम्हाला पडताळणी करायची असेल तर तुम्ही या पद्धतींचा नक्कीच विचार करु शकता. अन्यथा बाजारात मिळणारी किट घेऊन घरात चाचणी करुन पाहू शकता.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)