Prevent and Manage Frizzy Hair: कोरडे केस आणि त्यांचा रुक्षपणा टाळण्यासाठी काय कराल? जाणून घ्या कारणे, उपाय आणि आवश्यक टीप्स
Hair Care Tips: केसांची काळजी घेतली तर त्यातील कोरडेपणा रुक्षपणा कमी होतो. तुम्हालाही कोरड्या आणि रुक्ष केसांची समस्या सतावत असेल तर, प्रभावी घरगुती उपाय, तज्ञ टिप्स आणि सर्वोत्तम केसांची काळजी घेण्याच्या पद्धती, जाणून घ्या
तुमचे केस कोरडे आणि रुक्ष (Frizzy Hair) झालेत? ते तसे झले असतील तर ते पुन्हा निट करणे हे काहीसे आव्हानात्मक असू शकते. परंतू ते पूर्णच अशक्य आहे असे नाही. योग्य काळजी आणि उपाय करुन ते पुन्हा पूर्णपणे नियंत्रित आणि पुनर्स्थापीत म्हणजेच पूर्वीसारखेच सुंदर, चमकदार आणि लांबसडक करता येऊ शकतात. होय, पण त्यासाठी त्याची कारणे आणि उपाय (Anti-Frizz Remedies) लक्षात घ्यावे लागतात. त्यानंतरच आपणास केसांचा रुक्षपणा दूर करता येऊ शकेल. अगदीच प्राथमिक कारणांचा विचार करायचा तर, केस आणि त्यांच्या मुळाशी असलेल्या त्वचेमध्ये असलेला ओलावा संपणे किंवा कमी झाल्याने त्यात कोरडेपणा येतो. सहाजिकच केसांना आवश्यक प्रमाणात भरणपोषण मिळत नाही. परिणामी ते रुक्ष व्हायला लाहतात. विशेषतः दमट वातावरणात ही परिस्थिती अधिक उद्भवू शकते. केसांची योग्य काळजी घेण्याच्या सवयी अंगीकारल्याने हा ओलावा पुन्हा प्रस्तापित होण्यास आणि त्यातील रुक्षपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
केस कोरडे किंवा रुक्ष का होतात?
केसांची मुळे, त्याखालील त्वचा हा नेहमी ओलसरपणा शोधत असते. जी त्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिकरित्या आवश्यक असते. मात्र, कधी कधी वातावरण किंवा जीवनशैलीतील बदल, वैद्यकीय उपचार यांमुळे हा ओलसरपणा निघून जातो, खंडीत होतो अथवा संपतो. सहाजिक हे केस आणि त्यांची मुळे हवेतील ओलावा शोषून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केसांचा क्यूटिकल, ज्यामध्ये ओव्हरलॅपिंग स्केल असतातत, ते चमकदार राहण्याऐवजी वर येतात आणि केसांना कोरडे करु लागतात. वास्तविक पाहता केसांचा कोरडेपणा वाढीस लागण्यासाठी एखादेच कारण असत नाही, त्यासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात. ज्यात खालील घटकांचा प्रमुख समावेश आहे:
- आर्द्रता (Humidity): ओलसर हवा कोरड्या केसांना फुगवते, ज्यामुळे रुक्ष होतात.
- उच्च तीव्रतेचा शॅम्पू (Harsh shampoos): अल्कलाइन-आधारित शॅम्पू केसांचे नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात.
- अल्कोहोल-आधारित स्टायलिंग उत्पादने (Alcohol-based Styling Products): अल्कोहोल असलेले जेल आणि स्प्रे केस कोरडे करतात.
- जास्त उष्णता स्टायलिंग (Excessive Heat Styling): ब्लो-ड्रायर, स्ट्रेटनर्स आणि कर्लिंग आयर्न केसांची ओलावा कमी करतात, ज्यामुमळे ते रुक्ष होतात.
(हेही वाचा, Back Pain and Hair Loss: केस गळणे, पाठदुखी आणि Vitamin D यांचा काय आहे संबंध? घ्या जाणून)
केसांना कोरडे आणि रुक्ष होण्यापासून कसे रोखाल?
केसांचा चमकदारपणा, सौदर्य टिकविण्यासाठी आणि त्यांना रुक्ष होण्यापासून वाचविण्यासठी योग्य काळजी आणि पोषण आवश्यक असते. त्यासाठी तज्ज्ञ काही टीप्स सूचवतात. त्या खालीलप्रमाणे:
- शाम्पूचा वापर मर्यादित करा: जास्त धुण्याने केसांतील आवश्यक तेलाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ते कोरडे होतात. धुण्यांमधील अंतरामुळे तेलकट केसांनाही फायदा होतो.
- उष्णतेचा संपर्क कमी करा: गरम पाण्याऐवजी केस थंड किंवा कोमट पाण्याने धुवा. स्टायलिंग करण्यापूर्वी उष्णता-संरक्षण करणारे सीरम वापरा आणि साधने कमी तापमानावर ठेवा.
- आर्द्रतेपासून संरक्षण करा: दमट हवामानात तुमचे केस टोपी किंवा स्कार्फने झाकून ठेवा. लीव्ह-इन सीरम आणि अँटी-फ्रिझ स्प्रे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
- वर्कआउट दरम्यान केसांची काळजी घ्या: घाम आणि आर्द्रता कोरडेपणा वाढवू शकते. व्यायाम करताना बेसबॉल कॅप किंवा अंबाडा घालून तुमचे केस सुरक्षित करा.
- आठवड्याचे हेअर मास्क वापरा: डीप-कंडिशनिंग ट्रीटमेंट ओलावा पुनर्स्थापीत करतात आणि केस चमकदार करतात, कोरडेपणा दूर ठेवतात.
(हेही वाचा, Lifestyle And Hair Loss: तणावग्रस्त जीवनशैली ठरते केसगळती आणि टक्कल पडण्यास कारण? तुम्ही असता सतत व्यग्र असता का?)
दरम्यान, केसांचा कोरडेपणा आणि पर्यावरणीय घटकांमुळे ते रुक्ष, कोरडे होतात. परंतु योग्य हायड्रेशन आणि केसांची काळजी ते प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करू शकते. घरगुती उपचार, संरक्षणात्मक उपाय आणि ओलावायुक्त उत्पादने वापरल्याने केसांची चमक, लांबसडकपणा पुन्हा मिळविण्यास फायदा मिळू शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)