हिवाळ्यात गरम पाण्याने किती वेळात अंघोळ करावी, नाहीतर होईल नुकसान
कारण या दिवसात तापमानाचा पारा खाली उतरल्याने आरोग्यावर त्याचे परिणाम होत आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजारात येणाऱ्या विविध लोशन किंवा क्रिमचा वापर केला जातो. मात्र काही जणांना थंडीत अधिक कडक गरम असलेल्या पाण्याने अंघोळ करणे फार आवडते.
हिवाळ्याचे दिवस जवळ आल्याने वातावरणात सुद्धा बदल झालेला दिसून येतो. कारण या दिवसात तापमानाचा पारा खाली उतरल्याने आरोग्यावर त्याचे परिणाम होत आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजारात येणाऱ्या विविध लोशन किंवा क्रिमचा वापर केला जातो. मात्र काही जणांना थंडीत अधिक कडक गरम असलेल्या पाण्याने अंघोळ करणे फार आवडते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीरात उब निर्माण होत व्यक्तीला आरामदायी सुद्धा वाटते. परंतु काही मिनिटांच्या पण जास्त काळ गरम पाण्याने अंघोळ केल्यास तुमच्या आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
तर गरम पाणी अंगावर लावलेल्या मॉइस्चराइझर सहजतेने धुवून काढतात. मात्र जर तुम्ही अधिक काळ गरम पाण्याचा वापर करत असल्यास त्वचेवरील नैसर्गिक मॉइस्चर कमी होऊन ती डॅमेज होऊ शकते. त्याचसोबत कोरड्या त्वचेवर भेगा पडल्याचे ही थंडीत दिसून येते. जरी तुम्हा कोरडी त्वचेचा काही त्रास होत नसला तरीही रॅशेज आणि खाज येण्याची समस्या उद्भवते. असे झाल्यास प्रथम डॉक्टरांकडे जात त्यांच्या सल्ला घ्यावा. त्याचसोबत थंडीत त्वचेत बॅक्टिरिया अधिक घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे इनफेक्शन होऊ शकते. तर एका अभ्यासानुसार, हिवाळ्यात आणि अन्य वेळी ही व्यक्ती जर 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्याने अंघोळ करत असल्यास त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.(Winter Lips Care Tips: हिवाळ्यात या '5' घरगुती उपायांनी घ्या गुलाबी ओठांची काळजी)