उन्हाळ्यात नाकातून रक्त येत असल्याचा त्रास होत असल्यास हे करा घरगुती उपाय
तसेच वाढत्या गर्मीमुळे नाकातून रक्त सुद्धा काही वेळेस आल्याचे दिसते.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर विविध आजार सुरु होण्यास सुरुवात होते. तसेच वाढत्या गर्मीमुळे नाकातून रक्त सुद्धा काही वेळेस आल्याचे दिसते. त्याला रक्तस्राव असे सुद्धा म्हटले जाते. मात्र ही काही गंभीर आजार नसून उन्हाळ्यात वाढत्या गर्मीमुळे याचा त्रास होते.
तर नाकातून उन्हाळ्यात रक्त येत असल्यास घाबरु नका. तर घरगुती उपायांनीसुद्धा तुम्ही यावर उपचार करु शकता. मात्र नाकातून रक्तस्राव येण्याचे प्रमाण अधिक वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा याबद्दल सल्ला घ्या.
-राईचे तेल
नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाल्यास ते थांबवण्यासाठी शांतपणे झोपावे. त्यानंतर राईचे तेल हलके गरम गेल्यानंतर थंड झाल्यास त्याने दोन-तीन थेंब नाकात सोडावे.
-थंड पाणी
रक्तस्राव होत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी सोडावे. तसेच एका कपड्यात बर्फ घेऊन त्याने शेकवावे. त्यामुळे रक्तस्राव होण्यापासून आराम मिळतो.
-कांद्याचा रस
कांद्याचा रस हा रक्तस्रावासाठी गुणकारी आहे. नाकात कांद्याच्या रसाचे थेंब टाकल्यास रक्तस्राव होणे बंद होते.
-बेलांच्या पानांचा रस
बेलांच्या पनांचा रस काढून पाण्यातून प्यावा. त्यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या दूर होते.
(Summer 2019: उन्हाळयात केसांचे आरोग्य जपा,अशी राखा केसांची निगा)
उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या उन्हाचे तापमान. तसेच सातत्याने शिंका येत असल्याने सुद्धा रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.