Health Tips: शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात असावा 'या' अन्नपदार्थांचा समावेश
अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे अथवा खाऊ नये याबाबत सल्ला देतात.
नियमित व्यायाम करणे हा आजाराला स्वत: पासून दूर ठेवण्याचा रामबाण उपाय असे म्हणायला हरकत नाही. मात्र केवळ व्यायाम हा उपयोगाचा नसून व्यायाम शरीराला योग्य आणि पौष्टिक आहार मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे. असे न झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन (Hemoglobin) असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. याचाच अर्थ हिमोग्लोबिन कमी झाले की शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही आणि आजारपण येण्याची शक्यता असते.
माणसाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही पौष्टिक गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे अथवा खाऊ नये याबाबत सल्ला देतात.
पुढे दिलेल्या अन्नपदार्थांचा आहारात असावा समावेश
1. बीट
व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीट खाण्यामुळे मिळू शकतात. ज्यामुळे रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते. Summer Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायलाने शरीरास होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?
2. पालक
पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.
3. अंडी
अंडी खाल्ल्यामुळे शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.
4. सुकामेवा
निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा असे म्हटले जाते. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळू शकते.
हेदेखील वाचा- Mango Recipes: घरच्या घरी तयार करा आंब्यापासून बनवलेल्या 'या' हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज
5. मासे
कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळेल.
6. डाळिंब
डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी औषधांच्या मागे न लागता आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.