IPL Auction 2025 Live

Winter Health Tips: थंडीच्या दिवसात पायांना सूज येते? तर 'या' घरगुती उपयांनी मिळवा समस्येपासून सुटका

यामुळे पाय खुप दुखतात आणि त्वचा सुद्धा निघण्यास सुरुवात होते. या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यकच आहे. परंतु जास्त सूज येत नसल्यास तुम्ही घरगुती पद्धतीने सुद्धा त्यावर उपचार करु शकता.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Winter Health Tips: थंडीच्या दिवसात बहुतांश जणांच्या पायांच्या बोटांना सूज येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे पाय खुप दुखतात आणि त्वचा सुद्धा निघण्यास सुरुवात होते. या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यकच आहे. परंतु जास्त सूज येत नसल्यास तुम्ही घरगुती पद्धतीने सुद्धा त्यावर उपचार करु शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला पुढील काही सोप्प्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.(Covid-19: सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो- Study)

हिवाळ्यात अनेकदा हात आणि पाय सुजण्यामागे हे मुख्यतः अति थंड वातावरणात राहिल्यामुळे रक्त गोठणे हे असते. कारण हिवाळ्यात रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे हात आणि पाय बराच काळ थंड पडल्यास रक्त पुरवठा व्यवस्थितीत होत नाही. ज्यामुळे हातापायांना सूज येते आणि ते लाल दिसू लागतात.

बोटांना सूज येण्याची समस्या असेल तर तुम्ही चार चमचे राईचे तेल आणि सैंधव मीठ हे व्यवस्थितीत एकत्रित करुन ते गरम करा. गरम केल्यानंतर ते थोडे थंड झाले की रात्री झोपण्यापूर्वी सूज आलेल्या बोटांना लावा. या व्यतिरिक्त ऑलिव्ह ऑइल आणि अर्धा चमचा हळद यांचे मिश्रण ही तुम्ही बोटांना लावू शकता. यामुळे बोटांना येणारी खाज, जळजळ आणि दुखणे कमी होईल.(Sleep Tips: रात्रीच्या वेळी झोप येत नाही? फॉलो करा 'या' सोप्प्या टीप्स)

या व्यतिरिक्त लिंबूचा रस हा सुद्धा बोटांना आलेली सूज करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. आणखी एक घरगुती उपाय म्हणजे कांदा. तर कांद्याचा रस काढून तो सूज आलेल्या बोटांना लावा. याचा फायदा असा होतो की, कांद्यात अँन्टी-बायोटिक आणि अँन्टी-सेप्टिक गुण असतात. त्यामुळे बोटांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.