Easy Haircut Tips: लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी पुरुषांचे वा लहान मुलांचे केस कापण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

तुमच्या या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी लेटेस्टली मराठी ने बातचीत केली हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याशी आणि त्यांनी सांगितल्या घरच्या घरी केस कापण्याच्या काही सोप्या स्टेप्स:

Hair Cut (Photo Credits: PixaBay)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून देशभरात 21 दिवसांचे ठेवण्यात आलेले लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांपुढे अनेक समस्या उद्भवल्या असतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मात्र यामुळे पुरुषवर्गासमोर समस्या निर्माण झाली आहे ती आपले केस कापण्याची. 21 दिवसांपासून बंद असलेले सलून 14 एप्रिल ला उघडतील असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र आता हे लॉकडाऊन आणखी वाढल्यामुळे केश कर्तनालय म्हणजेच सलून अजून बंदच आहेत. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वाढत जाणारे केस कापायचे (Hair Cut) कसे असा मोठा प्रश्न पुरुषांसमोर आहे.

त्याचबरोबर लहान मुलांचेही केस वाढत चालल्याने त्यांच्या पालकांना केस कापायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुमच्या या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी लेटेस्टली मराठी ने बातचीत केली हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे (Vinayak Varde) यांच्याशी आणि त्यांनी सांगितल्या घरच्या घरी केस कापण्याच्या काही सोप्या स्टेप्स:

केस कापण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना:

केस कापण्याच्या स्टेप्स:

1. केस कापण्यास सुरुवातीला दोन भुवयांच्या मध्ये केसांचे दोन भाग करुन घ्या.

2. त्यानंतर तुम्हाला केसांच्या Crown (पुढील) भागाला 5 ते 6 भागांत विभागा.

3. लहान मुलांसाठी 4 भागांमध्ये विभागता येते.

4. त्यानंतर आपल्या दोन बोटांच्या आडव्या चिमटीमध्ये हे विभागलेले केस 90 अंशांमध्ये वर उचलायचे आहेत आणि मग हळूहळू एक एक भाग अशा पद्धतीने उचलून त्यांचे टोक कापायचे आहेत. (तुम्हाला केसांची जेवढी लांबी ठेवायची आहे तेवढी)

5. अशा पद्धतीने केस कापल्याने तुमची मूळ हेअर स्टाईल बदलत नाही. हे झाले पुढील भागांच्या केसांविषयी. Coronavirus संकट काळात भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Ministry of AYUSH ने सुचवले हे नैसर्गिक उपाय!

6. आपल्या डोक्यावरील मागील बाजूचे केस कापणे ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे शक्यतो तुमच्या मागील बाजूस कोणाला तरी उभे करा अथवा मागील बाजूस एक आरसा आणि समोरील बाजूस एक आरसा ठेवा.

7. पुढील बाजू प्रमाणे मागील बाजूचे केसही विभागा.

8. त्यानंतर एक एक भाग दोन बोटांच्या चिमटीमध्ये 90 अंशामध्ये वर उचलून घेऊन कापा.

9. मानेवर जे जास्त केस असतात ते कापण्यासाठी तुम्हाला रेजर वा ट्रीमरचा वापर करावा लागेल. तुम्हाला हवे तसे सरळ अथवा V आकारात तुम्ही केस कापू शकता.

10. कानाजवळील केस कापण्यासाठी तुम्हाला त्याचे 3 भाग करून वर सांगितल्याप्रमाणे बोटांच्या चिमटीमध्ये 90 अंशामध्ये ते उचलून एक एक भाग घेऊन वरचे टोक कापावे. Health Care Tips: तोंडाची दुर्गंधी, केसांची खुंटलेली वाढ, पोटाचे विकार सहित 'या' समस्यांवर उपाय आहे तुळशीचे पान; फायदे वाचून व्हाल थक्क

हे सर्व करत असताना आपल्याला काही इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्या. विशेषत: लहान मुले केस कापताना खूप हलतात अशा मुळे त्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांचे केस कापायचे असतील तर नीट काळजी घ्या आणि तुम्हाला खात्री असेल तरच त्यांचे केस कापा. या सोप्या टिप्स तुम्हाला Quarantine दरम्यान खूप उपयोगी पडतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif