गरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं; अन्यथा होईल मोठं नुकसान
गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती नसते. तसेच गरोदरपणात डॉक्टर्स जास्तीत-जास्त फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. परंतु, यातील काही फळे खाल्ल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती नसते. तसेच गरोदरपणात डॉक्टर्स जास्तीत-जास्त फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. परंतु, यातील काही फळे खाल्ल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
एका सामान्य स्त्रीला निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात 1800 ते 2000 कॅलरीजची आवश्यकता असते. गरोदरपणी स्त्रीला तिच्या बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अधिक 300 ते 400 अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. यासाठी गर्भवतींनी आपल्या आहाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. आज आपण या लेखातून गर्भवती महिलांनी गरोदरपणात कोणती फळे खाऊ नयेत याविषयी माहिती पाहणार आहोत. या फळांचे सेवन केल्याने गर्भवती महिलेला आणि बाळाला मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात खाली दिलेल्या या फळांचे सेवन करणे टाळा. (हेही वाचा - Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल 'कढीपत्ता'; जाणून घ्या फायदे)
गरोदरपणात चुकूनही खाऊ नका ही फळे -
अननस -
गरोदरपणात अननस खाणं महिलांसाठी हानीकारक ठरू शकतं. अननस हा एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी गुणकारी पदार्थ आहे. मात्र हे फळ गर्भवती स्त्रीयांसाठी हानीकारक ठरू शकते. अननसात ब्रोमेलन नावाचा घटक असतो. अननसाचे सेवन केल्याने महिलेचं गर्भाशय मऊ पडतं. त्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि पोटाच्या आजाराची समस्या निर्माण होते.
पपई -
पपई हे फळ महिलांना जास्त आवडतं. पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होण्यासाठी पपई जास्त प्रमाणात खाल्ली जाते. मात्र, गरोदरपणात महिलांनी पपई खाऊ नये. गरोदर महिलेने पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लेटॅस्क नावाचा पदार्थ गर्भाशयाला शोषून घेतो. त्यामुळे आई आणि बाळाच्या जिवाला धोकादायक निर्माण होतो.
द्राक्ष -
द्राक्ष हे पचनाला जड असतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी द्राक्षाचे सेवन करू नये. आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ धोकादायक ठरू शकतं. द्राक्षातील रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ शरीरातील हार्मोनला असंतुलित करतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी या फळाचे सेवन करू नये.
खजूर -
व्हिटॅमिन्स आणि आवश्यक न्यूट्रिएंट्सनं परिपूर्ण असं खजूर गरोदरपणात खाऊ नये. खजूराच्या सेवनाने शरीराचं तापमान वाढतं आणि गर्भाशय आकुंचित होत. दिवसाला एक किंवा 2 खजूर खाणं ठिक आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त खजूर खाल्ल्यास त्रास होण्याची शक्यता आहे.