IPL Auction 2025 Live

Monsoon Health Tips: पावसाळ्यातील आहारात या 7 गोष्टींचा अतिरेक आणू शकतो तुमच्या पचनक्रियेमध्ये ब्रेक

त्यामुळे खाण्याच्या नादात आपण काही गोष्टींचा इतका अतिरेक करतो ज्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. तसेच आपल्या पचनक्रियेवरही परिणाम होतो.

Representative Image (Photo Credits: Pixabay)

अस्सल खवय्यांचे जिभेचे चोचले वाढवणारा ऋतू म्हणजे पावसाळा (Monsoon). पावसाळा सुरु झाला की अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप काही तेलकट, तुपकट,थंडगार गोष्टी खाव्याशा वाटतात. त्यामुळे खाण्याच्या नादात आपण काही गोष्टींचा इतका अतिरेक करतो ज्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. तसेच आपल्या पचनक्रियेवरही (Digestion Problem) परिणाम होतो. पावसात मस्त गरमागरम गोष्टी खाण्याची मजाची काही और असते. यात भजी, समोसे, वडापाव, पानीपुरी यांसारख्या गोष्टी खाण्याची इच्छा जास्त होते.

मात्र या गोष्टींचा अतिरेक केल्यास आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊन आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचीही शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहोत, ज्याचा पावसाळ्यात अतिरेक केल्यास त्याचा विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होऊन पचनक्रिया बिघडू शकते.

1. पावसात मांसाहारी गोष्टींचे अतिसेवन टाळावे. कारण याच्या अतिसेवनाने तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते.

2. पावसाळ्यात कच्चे अंड, लोणचे, केचअप, मशरुम सारख्या गोष्टी खाऊ नका. याने पोटात गॅस होणे आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

3. आपल्याला कच्च्या भाज्या किंवा सॅलड खाण्याची आवड असते. मात्र पावसाळ्यात अशा कच्च्या भाज्या किंवा सॅलडचे अतिसेवन करु नका. त्यांना भाज्या चांगल्या शिकवून, वाफवून खा.

4. पावसाळ्यात पालक, कांदा, लसूण आणि हिरव्या भाज्या कमी खाणे.

5. शीतपेय अतिसेवन टाळणे. जमल्यास कोल्ड्रिंग पुर्णपणे वर्ज्य करणे. जास्तीत जास्त पाणी पिणे उत्तम.

हेही वाचा- पावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

6. सुका मेवा कमी खा. त्याऐवजी पावसाळी फळे आणि फळांचा रस पिणे फायद्याचे ठरु शकते.

7. तळलेले पदार्थ कमी खा. त्यात अगदीच जर तुम्हाला तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर घरी हे पदार्थ बनवून खा.

तसेच पावसाळ्यात शक्य होईल तितके शिळे अन्न खाऊ नका. खाण्यापिण्याची बाबतीत योग्य ती खबरदारी घेतल्यास पावसाळ्यात होणा-या आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. तसेच पचनक्रियेसंबंधी जास्त तक्रारीही उद्भवणार नाही.