Coronavirus: चप्पल व बुटांमुळे होऊ शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग? जाणून घ्या काय सांगते WHO 

साधारण फेब्रुवारीमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. यादरम्यान जगातील आरोग्य संघटना (WHO),

Coronavirus & WHO | (Photo credit: archived, edited, symbolic images)

चीनच्या (China) वूहान (Wuhan) शहरामधून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) आतापर्यंत जवजवळ सर्व देश काबीज केले आहेत. साधारण फेब्रुवारीमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. यादरम्यान जगातील आरोग्य संघटना (WHO), काही प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यांनी या विषाणूबाबत लोकांना माहिती देण्यास सुरुवात केली. हा विषाणू नक्की कसा होतो, त्यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत लोकांमध्ये जनजागृती घडू लागली. कपडे, धातू किंवा इतर गोष्टींद्वारेही हा विषाणू पसरू शकतो, हे समजल्यावर आता एक प्रश्न आहे की, चप्पल किंवा बूट यांच्यामार्फतही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो? यावर डब्लूएचओने स्पष्टीकरण दिले आहे.

डब्लूएचओ च्या म्हणण्याप्रमाणे चप्पल किंवा बूट अशा पादत्राणांद्वारे कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हा विषाणू चप्पल किंवा बुटाद्वारे फार कमी प्रमाणात पसरू शकतो. मात्र डब्लूएचओने पुढे म्हटले आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून, विशेषतः ज्या घरात लहान मुले जमिनीवर रांगत आहेत किंवा जमिनीवर खेळतात अशा ठिकाणी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरच आपले शूज किंवा चप्पल काढावेत. अशा गोष्टी घरात घेऊन जाऊ नये. यामुळे लहान मुलांचा धुळीशी किंवा कोणत्याही घाणीशी कमी संपर्क येईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते? WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा)

याआधी वृत्तपत्र किंवा हवेमार्फत कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे जगातील आरोग्य संघटनेने सांगितले होते. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 च्या झालेल्या उद्रेकाला 11 मार्च 2020 रोजी वैश्विक साथ म्हणून घोषित केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सतत हात धुणे व मास्कच्या वापरामुळे हा विषाणू काही प्रमाणात नियंत्रणात अनंत येईल, मात्र त्यासाठी मास्क सैल बांधू नका, मास्क लावताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकलेले असायला हवे, असे सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य संस्था, डॉक्टर्स आणि जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा हा 'Touch Fest' म्हणजेच 'स्पर्शोत्सव' धोकादायक असल्याचे म्हटले आहे.