Corn Health Benefits: वजन कमी करण्यापासून, कर्करोगाचा धोका कमी करेपर्यंत 'हे' आहेत मका खाण्याचे आरोग्यदायी  फायदे  

अगदी वजन कमी करण्यासाठी ही मका खाल्ला जातो.आज जाणून घेऊयात मक्याचे शरीराला होणारे फायदे.

Photo Credit: pixabay

कॉर्न, पॉपकॉर्न, स्वीट कॉर्न चाट, कॉर्न सूप, कॉर्नसह पास्ता इत्यादी हे सर्व आता आपल्या स्नॅक्सचा एक भाग बनला आहे. देशाच्या बर्‍याच भागात त्याला मका किंवा कॉर्न असेही म्हटले जाते, जे अन्नाचा मूलभूत स्रोत आहे. यात मक्याच्या ब्रेड आणि बर्‍याच पदार्थांचा समावेश आहे. पण फक्त स्नॅक्स म्हणून नाही तर मका खाण्याचे शरीराला बरेच फायदे होतात. अगदी वजन कमी करण्यासाठी ही मका खाल्ला जातो.आज जाणून घेऊयात मक्याचे शरीराला  होणारे फायदे. ( भारतीय तरुणांमध्ये वाढतोय Heart Attack चा धोका; जाणून घ्या काय आहेत तारुण्यपणी हृदयविकाराचा झटका येण्याची कारण )

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते

मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन समृद्ध

बहुतेक सर्व प्रकारच्या कॉर्नमध्ये अ, बी, ई आणि के जीवनसत्त्वे असतात. त्यात आढळणारे व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांचा प्रकाश वाढवते आणि डोळ्याच्या समस्या दूर करते.

कर्करोगाचा धोका कमी करते

कॉर्नमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स कर्करोगाचा धोका कमी करतात. (Winter Skin Care Tips: थंडीत अंगाला सुटणारी खाज कमी करण्यासाठी काय कराल?, जाणून घ्या काही सोप्प्या घरगुती टिप्स )

हाडे बळकट होतात

मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

वजन कमी करण्यासाठी

आपण वजन कमी करू इच्छित असल्यास, आपल्या आहारात कॉर्न फ्लेक्स समाविष्ट करा. हे आपल्या शरीरात कॅलरींचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे वजन सहजतेने कमी होते. मध, केळी, स्ट्रॉबेरी, सफरचंद इत्यादी फळांसह कॉर्न फ्लेक्स आपल्यासाठी आरोग्यासाठी स्नॅक्स ठरू शकतात.

दृष्टी सुधारते

मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif