Big Penis USA: लिंगाचा आकार वाढवण्यासाठी औषधे घेत असाल तर व्हा सावध; 'बिग पेनिस युएसए' मध्ये आढळले हानिकारक घटक
या उत्पादनामुळे आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला टीजीएने दिला आहे.
सेक्समध्ये (Sex) लिंगाचा आकार (Penis Size) किंवा लांबी तितकीशी महत्वाची ठरत नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला कसे खुश करायचे हे माहित असल्यास उत्तम शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात. मात्र अजूनही पुरुषांचे पौरुषत्व हे लिंगाशी जोडलेले आहे. लिंगाच्या आकारावरून पुरुष स्त्रीला खुश ठेऊ शकेल की नाही हे ठरवले जाते. आपल्या लिंगाचा आकार वाढवण्यासाठी जगभरातील पुरुष विविध प्रकारची औषधे-गोळ्या घेतात. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे ‘बिग पेनिस यूएसए’ (Big Penis USA). आता ऑस्ट्रेलियन लोकांना या ‘बिग पेनिस यूएसए’ टॅब्लेटबाबत इशारा देण्यात आला आहे.
या उत्पादनाची चाचणी केली असता त्यामध्ये सिल्डेनाफिल आढळल्यानंतर थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनने- टीजीए (Therapeutic Goods Administration) गुरुवारी बिग पेनिस यूएसए गोळ्यांविरुद्ध तातडीची चेतावणी जारी केली. ‘बिग पेनिस यूएसए’ टॅब्लेटमुळे तुमच्या आरोग्यासाठी गंभीर धोका आहे आणि ते घेऊ नये, असे टीजीएने म्हटले आहे.
सिल्डेनाफिल हे एक प्रिस्क्रिप्शन-ओन्ली औषध आहे जे सामान्यतः व्हायग्रा या ब्रँड नावाखाली विकले जाते आणि ते इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे औषध रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत कमी करू शकते. बिग पेनिस यूएसएमध्ये सिल्डेनाफिल आढळल्याने या गोळ्यांचा पुरवठा बेकायदेशीर असल्याचे संघटनेने सांगितले आहे.
टीजीए आता ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स (ABF) सोबत बिग पेनिस यूएसए टॅब्लेटची भविष्यातील शिपमेंट ऑस्ट्रेलियात येण्यापासून रोखण्यासाठी मदत करत आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स सीमेवर अडवलेली बिग पेनिस यूएसए उत्पादने जप्त करेल आणि नष्ट करेल. ऑस्ट्रेलियन स्टोअरमध्ये ही उत्पादने विकली जात नाहीत. लोक अशी उत्पादने इंटरनेटवरून खरेदी करतात. (हेही वाचा: यूएस मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइट्समध्ये xnxx.com, xvideos.com आणि pornhub.com चा समावेश, जाणून घ्या संपूर्ण यादी)
टीजीएने ग्राहकांना अज्ञात परदेशी इंटरनेट साइटवरून औषधे खरेदी करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, कारण त्यात अज्ञात आणि संभाव्य हानिकारक घटक असू शकतात. या उत्पादनामुळे आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला टीजीएने दिला आहे. तसेच याबाबत 1800-020-653 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे किंवा टीजीएकडे तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.