Health Tips: द्राक्ष खाल्ल्यामुळे होणारे 'हे' फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
तसचे द्राक्षांमध्ये असलेले फ्रुटोज आणि ग्लुकोज रक्तात सहजपणे शोषले जाते आणि ज्यामुळे थकवा दूर होतो.
उन्हाळा एक असा ऋतू आहे की ज्यात कोणकोणती फळे खावीत असा प्रश्न पडलेला असतो. या ऋतूत अनेक फळे उपलब्ध होतात. त्यामुळे सर्वच फळांवर तुटून पडावे असे प्रत्येकाला वाटते. आंब्यासह संत्री, मोसंबी, पेर, द्राक्ष, कलिंगड यांसारखी बरीच फळे उन्हाळ्यात उपलब्ध होतात. द्राक्ष हे फळ चवीला देखील गोड असते. त्यामुळे अनेकांना द्राक्ष खावीशी वाटतात. अनेकांना द्राक्ष खायला आवडत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का दिसायला छोटे असणारे हे फळ शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे याकडे पाठ फिरवून देखील चालणार नाही.
द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तसचे द्राक्षांमध्ये असलेले फ्रुटोज आणि ग्लुकोज रक्तात सहजपणे शोषले जाते आणि ज्यामुळे थकवा दूर होतो.
हेदेखील वाचा- Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत
द्राक्षामुळे शरीरावर होणारे फायदे:
1. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून तीन-चार वेळा द्राक्षाचे सेवन करा.
2. मायग्रेनचा त्रास होणा-यांना द्राक्षांचा रस फायदेशीर ठरेल.
3. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
4. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन 'ई' जीवनसत्व असल्यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे यांसारख्या समस्या दूर होतात.
5. द्राक्ष खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणा-या वेदना आणि जळजळ कमी होते.
6. द्राक्षामुळे पित्त, अपचन यांपासून आराम मिळतो.
Weight Loss Tips: Lockdown मध्ये घर बसल्या 'हे' पेय पिऊन करा वाढलेल वजन कमी - Watch Video
द्राक्षांवर औषधे मारल्यामुळे ती ताबडतोब पाण्यात धुवून न खाता काही किमान 10-15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावी. ज्यामुळे त्यावर मारलेली औषधे तुमच्या शरीरात जाणार नाही वा कोणताही दुष्परिणाम होणार नाही.