Diabetes Care: गेल्या 4 वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ; ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंगसाठी CGM ठरतयं वरदान, वाचा सविस्तर
इन्सुलिनवर असलेल्या टाइप २ मधुमेहाने पीडित व्यक्तींनी सीजीएमचा वापर केल्यामुळे क्रोनिक मधुमेह आजाराचे प्रमाण (५१ टक्के) आणि हॉस्पिटलाझेशन्स (२८ टक्के) यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Diabetes Care: सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण मधुमेहासारख्या (Diabetes) आजाराला बळी पडत आहेत. २०१९ ते २०२३ दरम्यान मधुमेही व्यक्तींच्या संख्येत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या रुग्णांना वेदनेशिवाय किंवा त्रासाशिवाय या गंभीर स्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्याची गरज आहे. इन्सुलिनवर असलेल्या टाइप २ मधुमेहाने पीडित व्यक्तींनी सीजीएमचा वापर केल्यामुळे क्रोनिक मधुमेह आजाराचे प्रमाण (५१ टक्के) आणि हॉस्पिटलाझेशन्स (२८ टक्के) यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मधुमेहासारख्या क्रोनिक स्थितीचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरू शकते. व्यक्ती त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवलंब करू शकतात, जसे त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल, नियमितपणे व्यायाम, आरोग्यदायी आहाराचे सेवन आणि त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवणे.
सीजीएमद्वारे रक्तातील शर्करेच्या पातळ्या तपासणे -
रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवल्याने वैयक्तिक जीवनशैली व केअरबाबत निर्णय घेता येऊ शकते. कन्टिन्युअल ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सारख्या प्रगत तंत्रज्ञानासह हे सुलभ करण्यात आले आहे. प्रबळ डेटा उपलब्ध असल्यास व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेचे व्यवस्थापन करण्यास आणि इतर आरोग्यविषयक आजारांचा धोका कमी करण्यास यामुळे मदत होऊ शकते. (हेही वाचा - Cotton Candy Banned in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये 'बुडी के बाल'च्या विक्रीवर बंदी; कॅन्सर निर्माण करणाऱ्या विषारी रसायनामुळे घेण्यात आला निर्णय)
सीजीएममुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख -
अॅबॉटच्या इमर्जिंग एशिया व भारतातील डायबेटिस केअरच्या मेडिकल अफेअर्सचे प्रमुख डॉ. प्रशांत सुब्रमण्यम यांनी सांगितलं की, 'सीजीएम व्यक्तींना विनासायास रिअल-टाइममध्ये त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवण्यास मदत करते, जे पारंपारिक ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईसेसला पूरक आहे, ज्यामध्ये बोटाला टोचणे आवश्यक असते. सीजीएम बहुमूल्य, कृतीशील माहिती सांगते. तसेच हे डिवाईस अद्वितीय मेट्रिक, लक्ष्य ग्लुकोज रेंजमध्ये व्यक्तींनी व्यतित केलेला वेळ याबाबत देखील माहिती देते. (हेही वाचा - mRNA Cancer Vaccine Trial: कॅन्सर वरील उपचारांमध्ये आता 'mRNA'लस संजीवनी ठरणार? UK मध्ये ट्रायल्स सुरू)
सीजीएममुळे धोका टाळणे शक्य -
दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि लीड्स टीचिंग हॉस्पिटल्स एनएचएस ट्रस्टचे मेटाबोलिक मेडिसीनचे प्रोफेसर/ डायबेटिस व एण्डोक्रिनोलॉजीमधील कन्सलटण्ट प्रो. रामझी अज्जान यांनी सांगितले की, मधुमेही व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवावी लागते, तसेच हृदयविषयक आजार, लठ्ठपणा व डोळ्यांसंबंधित समस्या अशा इतर कोमोर्बिडीटीज विकसित होण्याचा धोका असतो. मधुमेह व लठ्ठपणाचा अनेकदा एकमेकांशी संबंध दिसून आला आहे. यामुळे हृदयविषयक आजाराचा धोका वाढतो. सीजीएम व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यास आणि असे धोके टाळण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, नुकतेच हार्ट अॅटॅक आलेल्या आणि सीजीएम डिवाईसचा वापर करत असलेल्या टाइप २ मधुमेहाने पीडित व्यक्तींमधील हायपोग्लासेमिया पातळ्या पारंपारिक सेल्फ-मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोजचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास आले. हायपोग्लायसेमिया टाळल्याने या उच्च जोखीम व्यक्तींना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यास मदत होऊ शकते.'
तथापी, प्रेसिडेंट इंडियन अकॅडमी ऑफ डायबिटीज कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट प्रो. शशांक आर जोशी (पद्मश्री पुरस्कारप्राप्त) यांनी सांगितले की, राज्यामध्ये जवळपास 10.3% व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी ग्लायसेमिक नियंत्रणाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, जे सीजीएम सारख्या टूल्ससह सुलभ करता येऊ शकते. सीजीएम त्यांना त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांची नियमितपणे तपासणी करण्यास मदत करते. यामुळे व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेवर परिणाम करणारा आहार व जीवनशैलीबाबत समजण्यास मदत होऊ शकते. व्यक्ती त्याअनुषंगाने त्यांच्या सवयींमध्ये, तसेच डॉक्टरांशी सल्लामसलत करत उपचारामध्ये बदल करू शकतात. परिणामत: त्यांची ऑप्टिमल ग्लुकोज रेंज दररोज जवळपास १७ तासांपर्यंत राहू शकते. हे कनेक्टेड तंत्रज्ञान त्यांच्या लिंक केलेल्या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून आमच्या क्लिनिक्सबाहेर देखील व्यक्तींना त्यांच्या घरांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)