Happy Dhammachakra Pravartan Day 2021 Images: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, जो बौद्ध आणि नव-बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे.
Dhammachakra Pravartan Day HD Images: धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, जो बौद्ध आणि नव-बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी येथे त्यांच्या 600,000 अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जातीय दडपशाहीपासून मुक्तीचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील जातिव्यवस्थेअंतर्गत सतत होणाऱ्या दडपशाही आणि भेदभावाचा सामना करण्यासाठी बौद्ध धर्मात रुपांतर करण्याचे मोठे पाऊल उचलले होते. ही भारतातील इतिहासातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी एक अतिशय महत्वाचा दिवस आहे, म्हणून या दिवशी या धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिनानिमित्त खालील एचडी इमेज पाठवून एकमेकांना शुभेच्छा पाठवता येणार आहे. हे देखील वाचा- Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा
फोटो-
फोटो-
फोटो-
फोटो-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती जागा दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते. या विशेष दिवशी जगभरातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचतात आणि हा उत्सव आनंदाने साजरा करतात. या दिवशी डॉ आंबेडकर आणि त्यांच्या शिकवणींचे स्मरण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यासह नव-बौद्धांची स्तुती आणि आदर करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमतात.