Margashirsha Guruvar Fast Reciepes: मार्गशीष महिन्यात उपवासाच्या दिवशी झटपट बनणाऱ्या 'या' पाच हटके रेसिपी नक्की ट्राय करा!
मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे.
Margashirsha Guruvar Fast Reciepes: हिंदू संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक सौभाग्यवती स्त्रिया महालक्ष्मीचं व्रत (Mahalaxmi Vrat) करतात. या महिन्यात मांसाहार केला जात नाही. यंदा मार्गशीर्ष महिना यंदा 27 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून 26 डिसेंबरला संपणार आहे. या महिन्यामध्ये दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. या दिवशी महिला लक्ष्मीमातेचं व्रत करून उपवास करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री लक्ष्मीमातेला नैवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. तुम्ही या दिवशी दिवसभर फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. मात्र, तुम्हाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी अगदी कमी वेळत तयार होणाऱ्या नव-नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग या खास लेखातून जाणून घेऊयात उपवासाच्या रेसिपी...
साधारणता सर्वच उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी बनवतात. उपवास म्हटलं की, प्रत्येकाच्या घरी हा पदार्थ बनवला जातो. काहींना खिचडी खूपच जास्त आवडते तर काहींना मात्र, खिचडी खाऊन-खाऊन कंटाळा येतो. तसेच दुसऱ्या काही रेसिपी करायच्या म्हटलं की, खूप मेहनत करावी लागते. परंतु, तुम्ही खाली दिलेल्या सर्व रेसिपी अगदी कमी वेळात तयार करू शकता.
हेही वाचा - Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?
फराळी मिसळ -
तुम्ही अगदी कमी वेळेत टेस्टी फराळी मिसळ बनवू शकता. यासाठी तुम्हाला साबुदाणा बटाटा, बटाट्याचा तळलेला किस, रताळ्याचे छोटे तुकडे, अर्धी वाटी खोवलेला नारळ, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, दही, कोथिंबीर, तूप हे साहित्य लागेल.
झटपट उपवासाचे आप्पे -
तुम्ही तांदळाचे आप्पे तर अनेकदा खाल्ले असतील. आता तुम्ही उपवासाचेही आप्पे अगदी काही वेळात बनवू शकता. यासाठी तुम्हाला साबुदाणा, वरई, जिरं, मीठ, दही, आदी साहित्य लागेल. तुम्ही अगदी कमी वेळात उपवासाचे आप्पे बनवू शकता.
उपवासाचा बटाटा वडा -
महाराष्ट्रात सर्वाधिक बटाटा वडा खाल्ला जातो. मुंबईमध्ये अनेक लोक बटाटा वडा खाऊन आपले पोट भरतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? तुम्ही उपवासाच्या दिवशीही बटाटा वडा खावू शकता. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने उपवासाचा वडा बनवू शकता.
उपवासाचे मेदुवडे -
तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थ आवडत असतील तर उपवासाच्या दिवशी मेदुवडे नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत मेदुवडे तयार होतात. यासाठी तुम्हाला भगर, साबुदाणा, बटाटा आदी पदार्थ लागतील.
कुरकुरीत उपवासाचे धिरडे -
उपवासाच्या दिवशी कुरकुरीत उपवासाचे धिरडे बनवणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला उपवासाचं भाजणीचं पिठ लागेल. तव्यावर मंद आचेवर तुम्ही कुरकुरीत उपवासाचे धिरडे बनवू शकता.
भारतामध्ये विविध संस्कृतीनुसार उपवासात वर्ज्य गोष्टींमध्ये फरक आहे. त्यानुसार, आपण काही साहित्यात फेरबदल करू शकतो. पण या उपवासाच्या विविध पदार्थांनी तुमचा यंदाचा सण उत्सवाचा सीझन लज्जतदार होईल हे नक्कीच! त्यामुळे वर दिलेल्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि उपवासाचा आनंद घ्या.