World No Tobacco Day 2020: 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' निमित्त जाणून घ्या तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी 'हे' घरगुती उपाय

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो. तसेच तब्बल 9 लाख लोकांचा स्मोकिंगमुळे मृत्यू होतो.

World No Tobacco Day 2020 (PC - File Image)

World No Tobacco Day 2020: 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' (World No Tobacco Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो. तसेच तब्बल 9 लाख लोकांचा स्मोकिंगमुळे मृत्यू होतो.

पूर्वी तंबाखूचं सेवन 'आरोग्यदायी' मानलं जायचं. तंबाखूच्या झाडाला सोळाव्या शतकात 'The Holy Herb' म्हणजे पवित्र औषधी वनस्पती किंवा 'God's Remedy' देवाचं औषध म्हटलं जायचं. परंतु, हळूहळू या औषधी वनस्पतीचे व्यसनात रुपातंर झाले. आज आपण 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' निमित्त तंबाखूचे व्यसन सोडण्याचे काही घरगुती उपाय जाणून घ्या घेऊयात.  (हेही वाचा - Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत)

तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी घरगुती उपाय -

आपल्या आजूबाजूला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे अनेक लोक आहेत. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी आपण नेहमी पाहतो. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजार होतात. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif