World Music Day: संगीत ऐकल्याने तुमच्या शरीरावर होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
संगीत तुमच्या भकास झालेल्या आयुष्यात आनंद आणू शकतो. प्लेटो यांनी म्हटलंच आहे संगीत एक नैतिक कायदा आहे जो विश्वाला आत्मा देतो, मनाला पंख, कल्पनाशक्तीला उडाण आणि जीवनाला मोहिनी आणि प्रसन्नता देतं. अशा या संगीताचे शरीरावर खूप चांगले परिणाम होतात.
संगीत (Music) म्हणजे ताल सूर, लय, नाद आणि स्वर यांचे मिश्रण. संगीताचे सारेगमपधनी हे सात स्वर माणसाच्या मनावर अशी काही जादू करू शकतात ज्यामुळे मनावर आलेला ताण, नैराश्य दूर होऊ शकते. असा या संगीताला समर्पित म्हणून 21 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक संगीत दिन (World Music Day) साजरा केला जातो. 21 जून 1982 पासून झाली आहे. फ्रांसमधून जागतिक संगीत दिन साजरा करण्याच्या प्रथेला सुरूवात झाली. ‘Fete de la Musique’ या नावाने फ्रान्स मध्ये खास सेलिब्रेशन केलं जातं. यामध्ये प्रख्यात संगीत क्षेत्रातील कलाकार सामान्यांसोबत संगीत सोहळ्याचं सेलिब्रेशन करतात.
संगीताचे माणसाच्या शरीरावर त्याच्या मनावर खूप लाभदायक फायदे होतात. संगीत तुमच्या भकास झालेल्या आयुष्यात आनंद आणू शकतो. प्लेटो यांनी म्हटलंच आहे संगीत एक नैतिक कायदा आहे जो विश्वाला आत्मा देतो, मनाला पंख, कल्पनाशक्तीला उडाण आणि जीवनाला मोहिनी आणि प्रसन्नता देतं. अशा या संगीताचे शरीरावर खूप चांगले परिणाम होतात.
1. मेंदू
संगीत हे मेंदूसाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार संगीत ऐकल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असल्यास संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते.
2. हृदय
जर तुमच्या हृदयाचे ठोके वाढले असतील तर ते सुरळीत करण्यासाठी सुरेल संगीत ऐकणे उपयोगी ठरू शकते. त्याचबरोबर श्वसनासंबंधीचे आजारही बरे होऊ शकतात. World Music Day 2019: जागतिक संगीत दिन साजरी करण्याची प्रथा कशी आणि कुठून झाली?
3. उच्च रक्तदाब
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुमच्यासाठी सुमधूर संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते.
4. मानसिक संतुलन
सुरेल वा तुमच्या आवडीच्या संगीताने तुमचे मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते. तुमचा कंटाळवाणा दिवस देखील छान बनवते.
5. फिटनेस
संगीताच्या तालावर व्यायाम किंवा नृत्य केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.
भारतामध्येही संगीत हे प्राचीन काळापासून आपल्या प्रत्येक सुख दु:खाच्या क्षणी सोबत असतं. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे. देव देवतांच्या कथांमध्ये संगीताचा, विविध वाद्यांचा आणि त्यामधून घेतल्या जाणार्या संगीतप्रकारांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे शरीरास फायदेशीर असे संगीत ऐकणे केव्हाही चांगले, नाही का!