World Environment Day 2022 Wishes in Marathi: जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा, Greetings, WhatsApp Status द्वारा शेअर करून व्यक्त करा निसर्गप्रेम!

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यंदा 5 जूनला तुमच्या नातेवाईकांना, निसर्गप्रेमी मित्रमंडळींना खास शुभेच्छा,Facebook Messages, Quotes शेअर करत साजरा करा हा खास दिवस!

जागतिक पर्यावरण दिन । File Image

दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एका विशिष्ट थीम वर पर्यावरण दिन साजरा करण्याची परंपरा यंदा 50 वर्ष पूर्ण करत आहे. 'Only One Earth' या थीमवर  यावर्षी पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. मग पर्यावरणप्रेमींसाठी खास असणा‍र्‍या या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना देत पर्यावरणाबद्दल सजगता निर्माण  करायला मदत करा. त्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, HD Images, Wallpapers शेअर करत आजचा दिवस सेलिब्रेट यंदाचा पर्यावरण दिवस नक्की साजरा करा.

यंदा जगात पर्यावरण दिन ‘Only One Earth’ या थीमच्या अनुषंगाने निसर्गाशी एकरूपतेने जगणे आवश्यक असल्याचा संदेशासाठी साजरा केला जाणार आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आपण जागतिक स्तरावर पृथ्वीच्या संरक्षणासाठी, तिच्या रिस्टोअर साठी आणि तिला सेलिब्रेट करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यासाठी जागृती करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

जागतिक पर्यावरण दिन । File Image

पृथ्वीचे संवर्धन करू

पर्यावरणाला जपत भविष्य घडवू

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

जागतिक पर्यावरण दिन । File Image

करूया पृथ्वीचे संगोपन

राखू पर्यावरणाचे संतुलन

जागतिक पर्यावरण दिन । File Image

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक पर्यावरण दिन । File Image

निर्सगाच्या देणगीचा सन्मान करूया

पर्यावरणाचे संवर्धन करूया

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

जागतिक पर्यावरण दिन । File Image

पृथ्वीलाही आपल्यासारखेच जगू द्या

तिच्यामुळे आपण आहोत याचे भान राहू द्या!

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2022 हा जागतिक पर्यावरणासाठी काम करणार्‍यांकरिता  एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे कारण 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, ज्याला पर्यावरणावरील पहिली आंतरराष्ट्रीय बैठक म्हणून मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते.