Constitution Day 2024 HD Images: भारतीय संविधान दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!

परिणामी संविधान दिवस देखील प्रत्येकासाठी खास आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या प्रियजनांना WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Constitution Day 2024 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

Constitution Day 2024 HD Images: भारतीय राज्यघटना (Constitution) ही प्रत्येक भारतीयासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. राज्यघटनेमध्ये मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. त्यामुळे दरवर्शी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन (Constitution Day) साजरा केला जातो. तसेच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले.

कोणताही कायदा करताना तो राज्यघटनेत दिलेल्या चौकटीत बसतो की, नाही याचा विचार केला जातो. त्यामुळे संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी संविधान महत्त्वाचं आहे. परिणामी संविधान दिवस देखील प्रत्येकासाठी खास आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या प्रियजनांना WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

भारतीय संविधान दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Constitution Day 2024 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

सर्वांना संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

शतशत नमन करतो मी तुजला भीमराया...

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Constitution Day 2024 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

भारत सरकारने सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत 2015 मध्ये अधिकृतपणे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला. 1946 च्या कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत स्थापन केलेल्या संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्याचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये डॉ सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष होते आणि डॉ राजेंद्र प्रसाद नंतर स्थायी अध्यक्ष बनले होते.