Ganeshotsav 2019: गणपतीला का वाहिल्या जातात दुर्वा? जाणून घ्या यामागची कथा

. दुर्वा या गणपतीला खूप प्रिय आहेत म्हणून त्याची पूजाअर्चा करण्यासाठी दुर्वा वापरल्या जातात. यात गणपती बाप्पा 21 दुर्वांची जुडी किंवा दुर्वा अर्पण केल्या जातात. गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा वाहण्यामागे मुख्य कारण म्हणजे गणपतीला दुर्वा प्रिय असतात हे कारणच आपल्याला माहित आहे किंवा वडिलधा-या व्यक्तींकडून हेच सांगितले जाते.

Ganesh Durva (Photo Credits: Instagram)

Ganesh Chaturthi 2019: गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र वाजत-गाजत गणरायाचे आगमन झाले आणि साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठाही ही झाली. यात प्राणप्रतिष्ठेसाठी किंवा गणरायाच्या पूजेसाठी लागणा-या साहित्यांमध्ये एका गोष्टीचा उल्लेख आर्वजून केला जातो त्या म्हणजे दुर्वा (Durva). दुर्वा या गणपतीला खूप प्रिय आहेत म्हणून त्याची पूजाअर्चा करण्यासाठी दुर्वा वापरल्या जातात. यात गणपती बाप्पा 21 दुर्वांची जुडी किंवा दुर्वा अर्पण केल्या जातात. गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा वाहण्यामागे मुख्य कारण म्हणजे गणपतीला दुर्वा प्रिय असतात हे कारणच आपल्याला माहित आहे किंवा वडिलधा-या व्यक्तींकडून हेच सांगितले जाते.

मात्र याचे खरं कारण आपल्यापैकी ब-याच जणांना माहित नसेल. जाणून घ्या यामागची पौराणिक कथा:

गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

हेही वाचा- Ganeshotsav 2019: गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील ही 10 गणेश मंदिरे ठरतात भाविकांचे आकर्षण, जाणून घ्या खासियत व इतिहास

दुर्वाचे औषधी गुणधर्म:

दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement