Laxmi Pujan 2022 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
हा सण केवळ भारतातच नाही तर जगभरात साजरा केला जातो. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी माँ लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. चला तर मग जाणून घेऊया, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, पाहा
Laxmi Pujan 2022 Date: सनातन धर्मातील मुख्य सणांपैकी एक म्हणजे दीपावली आहे. हा सण केवळ भारतातच नाही तर जगभरात साजरा केला जातो. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी माँ लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. हिंदू धर्मानुसार, दीपावली साजरी करण्यामागचे एक कारण हे आहे की, 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला राक्षस राजा रावणाचा वध करून परतले होते. तेव्हा लोकांनी दिवा लावून हा आनंद साजरा केला. तेव्हा पासून दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली जाते. चला तर मग जाणून घेऊया, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, पाहा
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त (Laxmi Puja Shubh Muhurat)
लक्ष्मी पूजन मुहूर्त: संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 (24 ऑक्टोबर 2022. सोमवार)
अमृत काल मुहूर्त: सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
अमृत काल मुहूर्त: सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)
लक्ष्मी पूजन विधी
दिवाळी हा महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दिवलीमध्ये लक्ष्मीपूजनला विशेष महत्व असत. दरम्यान, लक्ष्मी पूजन करण्याची विधी अनेकांना माहित नसते. लक्ष्मी पूजन विधीची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत, सर्व प्रथम एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा नवीन कपडा घालावा. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू आणि फुल वाहावे. मग एक चांदी, तांबा किंवा मातीचा तांब्या घेऊन त्यात गंगाजल घ्यावे आणि नारळ ठेवून त्यात विड्याचे पान किंवा आंब्याचे पान ठेवावे. लक्ष्मीची मूर्ती स्थापित करतांना कलशच्या डाव्या बाजूला स्थापित करावी आणि मूर्ती स्थापित करण्यापूर्वी अक्षता, हळदी, कुंकू आणि एक नाणे ठेवावे आणि त्यावर मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीची मूर्ती स्थापित केली त्या विधीनुसार गणपतीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी पूजनच्या दिवशी कुबेरची पूजा केली जाते. कुबेरची मूर्ती असल्यास ती ही तुम्ही ठेऊ शकतात. आता अन्य वस्तू मूर्ती समोर मांडाव्या, जसे की लाल डायरी, सोने इतर मौल्यवान वस्तू, तसेच बनवलेले नैवेद्य जसे की गोड फराळ आणि इतर नैवेद्य ठेवावे. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यासोबतच माता लक्ष्मीच्या श्री सूक्ताचे पठण करावे. या पद्धतीने कुबेर आणि माता सरस्वतीची पूजा करावी. सर्व देवतांची पूजा केल्यानंतर हवन करावे, मग नंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर मनोभावे आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी.
लक्ष्मी पूजन करतांना खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा, पाहा
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।