Veer Savarkar Punyatithi 2022: विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post, HD Images शेअर करुन द्या विनम्र आदरांजली

मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. तसेच कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आज 26 फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी आहे.

Veer Savarkar Quotes | File Image

Veer Savarkar Punyatithi 2022: प्रखर हिंदू विचारवंत विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. तसेच कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आज 26 फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी आहे. देशभक्त सावरकरांचं संपूर्ण आयुष्य तरूण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या ज्वलंत आणि दुरगामी विचारांमधून त्याचा प्रत्यय येतो. म्हणूनच आज त्यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीसाठी आदर्श असणार्‍या वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post, HD Images शेअर करुन द्या विनम्र आदरांजली!

1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी औषधे सोडून देत त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि 26 दिवसांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. पण आजही त्यांच्या तेजस्वी विचारांची ऊब कायम आहे.(Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Images: स्वामी दयानंद सरस्वती जयंती निमित्त मराठी Messages, WhatsApp Status, Wishes पाठवून द्या शुभेच्छा!)

वीर सावरकर केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते सोबतच ते क्रांतिकारक, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे समर्थक होते. विज्ञानाचा पुरस्कार करत त्यांनी जातीभेदालाही प्रखर विरोध केला होता.