Vasundhara Day 2020: जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो का साजरा केला जातो?

त्यासाठी पर्यावरण प्रेमींचे गट स्थापन करुन या गटांचे सदस्य अधिकाधिक वाढवता येतील. या गटांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक चित्रपट, प्रदर्शन, चर्चा आदींचे आयोजन करता येईल.

Vasundhara Day | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) गेलार्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ डे (Earth Day) ही संकल्पना मांडली. तेव्हापसून 22 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी वसुंधरा दिन (Vasundhara Day) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे एका अर्थाने गेलार्ड नेल्सन हे या दिवसाचे जनक आहेत असे मानले जाते. गेलार्ड हे पर्यावरण प्रेमी होते. अमेरिकेत त्यांनी 2 कोटींपेक्षाही अधिक नागरिकांमध्ये पर्यावरण आणि पर्यावरणीय समस्या यांबाबत जनजागृती केली. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या उद्योग, विकास आणि समुहाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यास गेलार्ड यशस्वी झाले. तेव्हापासून पर्यावरणाचे महत्त्व ध्यानात घेऊन वसुंधरा दिन (Vasundhara Day) जगभरात साजरा करण्यात येऊ लागला.

जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. अलिकडे मानवाला विकास आणि प्रगती या दोन गोष्टींची चटक लागली आहे. त्यामुळे मानव निसर्गावर विजय मिळवू पाहात आहे. त्यासाठी डोंगर सपाट करणे, झाडे तोडणे... जंगलं नष्ट करणे असे उद्योग मानव करत आहे. कोळसा आणि भूखनिजांसाठी अति प्रमाणावर जमीन खणली जात आहे. ज्यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. उद्योग आणि व्यवसाय उभारण्यासाठी, विस्तारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणास चालना दिली जात आहे. ज्यामुळे रसायणमिश्रीत पाणी ओढे, नाले, नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्याचा परिणाम समुद्रातील पाणी दुषीत होते. अशा या अत्यांत अणिबाणीच्या स्थिती वसुंधरा दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. (हेही वाचा, National Science Day 2020: 'राष्ट्रीय विज्ञान दिन' निमित्त जाणून घ्या चंद्रशेखर वेंकट रामन यांचा जीवन परिचय)

वसुंधरा दिनानिमित्त आपण समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करु शकतो. त्यासाठी पर्यावरण प्रेमींचे गट स्थापन करुन या गटांचे सदस्य अधिकाधिक वाढवता येतील. या गटांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक चित्रपट, प्रदर्शन, चर्चा आदींचे आयोजन करता येईल. महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपण, प्रदुषण टाळण्यासाठी जनजागृती, रासायनिक गोष्टी वापरण्यापेक्षा सेंद्रीय गोष्टी वापरण्यावर भर अशा अनेक गोष्टी अमलात आणून आपण पर्यावरणाबद्दल जनजागृती आणि कृती करु शकतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif