Valentine’s Day 2020 Messages: ‘व्हेलेंटाईन डे’ च्या मराठी शुभेच्छा, Wishes, Images, Whatsapp Status, Facebook Greetings देऊन खास करा तुमच्या आयुष्यातील ‘प्रिय’ व्यक्तीचा दिवस!
व्हेलेंटाईन डे 2020 च्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील 'त्या' खास व्यक्तीसोबत शेअर करून स्पेशल करा यंदाचा 14 फेब्रुवारीचा प्रेमाचा दिवस.
Happy Valentine’s Day 2020 Messages: फेब्रुवारी महिना सुरु झाला की तरूणाईमध्ये उत्सुकता असते ती म्हणजे व्हेलेंटाईन डे ची. कॉलेजच्या कट्ट्यांपासून गिफ्ट शॉप्स आणि फ्लॉवर मार्ट्समध्ये एक वेगळचं वातावरण निर्माण होतं. 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून 14 फेब्रुवारी पर्यंत व्हेलेंटाईन डे साजरा करताना प्रत्येक दिवस स्पेशल करण्यासाठी तरूण जोडपं एकमेकांना शुभेच्चा आणि गिफ्ट्स देतात. एकमेकांना प्रेमाची कबुली देण्याचा संदेश देणारा व्हेलेंटाईन डे तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तींसाठी खास करण्यासाठी खास मराठमोळे प्रेमाचे संदेश, SMS,व्हॉट्सअॅप मेसेज, स्टेटस, HD Images च्या माध्यमातून शेअर करून यंदाचा प्रेमाचा दिवस स्पेशल करा. Valentine Day 2020 Gift Ideas: प्रेमाचा गुलाबी दिवस समजल्या जाणा-या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला द्या भेटवस्तू म्हणून 'या' Useful गोष्टी.
सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. Valentine Day 2020 Horoscope: कोणत्या राशींना यंदाचा व्हॅलेनटाईन डे असणार खास, जाणून घ्या तुमचे भविष्य.
व्हेलेंटाईन डे 2020 मराठमोळे मेसेज
भाषा प्रेमाची आज मला कळले आहे
माझ्याही नकळत मन माझे तुझ्याकडे वळले आहे
एकमेकांपासून दूर राहून मन थेट मनाशी जुळले आहे
आठवणीत सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळाले आहे
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा !

प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
खास नातं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !

तुझं माझं नातं असं असावं
जे शब्दांच्या पलिकडे उमगावं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

डोळ्यातल्या स्वप्नांना कधी प्रत्यक्षात आण
किती प्रेम करतो मी तुझ्यावर हे न सांगताच जाण
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त आणि फक्त तुझीच आहे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

व्हेलेंटाईन डे व्हॉट्सअॅप स्टिकर्स
व्हॉट्सअॅप या जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅपमध्येही आता व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून शुभेच्छा देता येऊ शकतात. त्यासाठी गूगल प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून 'व्हेलेंटाईन डे' चा व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करा आणि शुभेच्छा शेअर करा.
दरम्यान जगभरात व्हेलेंटाईन डे 14 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीचा यंदाचा दिवस थोडा स्पेशल करा. त्यांच्या आवडीनिवडीनुसार खास सरप्राईज प्लॅन करा. म्हणजे त्यांच्यासोबतच तुमचा देखील व्हेलेंटाईन डे खास होईल.
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2020 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

