Valentine Week 2021, Kiss Day Wishes: व्हॅलेंटाईन वीकमधील 'किस डे'ला मराठी Quotes, Greetings, Images, WhatsApp Messages, SMS, HD Images शेअर करून द्या रोमँटिक दिवसाच्या शुभेच्छा
प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले
दरवर्षी, फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचे वारे वाहू लागतात. प्रेमात पडलेला किंवा पडू पाहणारा जवळजवळ प्रत्येक तरुण या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन वीक’ची (Valentines Week) वाट पाहत असतो. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार हा सप्ताह 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) दिवशी संपतो. या दरम्यान हे सातही दिवस खास पद्धतीने साजरे होतात. या आठवड्याची सुरुवात ‘रोज डे’ पासून होते जिथे तुम्ही कोणाला तरी गुलाब देऊन प्रपोज करता. त्यानंतर हळू हळू नात्याची वीण घट्ट करत 13 फेब्रुवारी रोजी येतो ‘किस डे’ (Kiss Day). या दिवशी तुम्ही आपल्या पार्टनरला किस करून, त्याचे चुंबन घेऊन आपल्या मनातील उत्कट प्रेम व्यक्त करता.
कधी सेक्सची पहिली पायरी म्हणून किस केले जाते, कधी फक्त प्रेम दर्शवण्यासाठी केले जाते, कधी शुभेच्छा देण्यासाठी तर कधी निरोप घेतानासुद्धा चुंबन दिले घेतले जाते. मात्र ‘व्हॅलेंटाईन वीक’ मधील किस डेचे चुंबन हे अतिशय खास असते कारण ते सर्वात रोमँटिक असते. यादिवशी तुमच्या मनातल्या भावना किसच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. तर या दिवसाला अजून स्पेशल बनवण्यासाठी काही Romantic Quotes, Greetings, Images, WhatsApp Messages, SMS, Wishes शेअर करून तुम्ही या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
(हेही वाचा: Kiss Day 2021 Gift Ideas: 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये 'किस डे' दिवशी जोडीदाराला खास गिफ्ट देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस)
दरम्यान, रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.