Surya Grahan 2019 Live Streaming: खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये लाईव्ह कसं आणि कुठे बघाल?

हे ग्रहण भारतीय थेट अनुभवू शकणार नाहीत. पण खगोलप्रेमींना हे सूर्यग्रहण ऑनलाईन माध्यमातून जगाच्या कोणत्याही टोकावर बसून पाहता येणार आहे.

सूर्य ग्रहण 2019 (Photo Credits: Pixabay)

Total Solar Eclipse 2019 Live Streaming: 2019 वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण (Surya Grahan) यंदा 2 जुलै 2019 ला दिसणार आहे. सूर्यग्रहण की केवळ एक भौगोलिक स्थिती आहे. मात्र भारतीय समाजात याबाबत अनेक समज गैर समज आहेत. काही जण या काळात कटाक्षाने जेवण बनवणं, आहार घेणं टाळतात. ग्रहणाचा काळ अशुभ असल्याचं मानातात. पण 2 जुलै 2019 चं ग्रहण भारतामधून दिसणार नसल्याने त्याचे वेध पाळू नयेत असं सांगितले जात आहेत. मात्र खगोलप्रेमींना 2 जुलैला होणार्‍या खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हांला ऑनलाईन माध्यमातून हे ग्रहण पाहता येऊ शकतं.

इथे पहा खग्रास सूर्यग्रहण 2019 

खग्रास सूर्य ग्रहणाचा काळ

2 जुलै 2019, मंगळवारी खग्रास सूर्यग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर हे ग्रहण रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी संपणार आहे.

कुठे पाहू शकाल खग्रास सूर्यग्रहण

चीली, अर्जेटीना, दक्षिण अमेरिका या भागात सूर्यग्रहण दिसता येणार आहे. पहा या वर्षभरातील ग्रहणांची संपूर्ण यादी  

2019 मधील तिसरे आणि अंतिम सूर्यग्रहण 26 डिसेंबरला दिसणार आहे. हे भारतातून पाहता येणार आहे. तर जुलै महिन्यातच 16 तारखेला भारतीयांना गुरूपौर्णिमेदिवशी चंद्रग्रहण पाहता येणार आहे.