Swami Vivekananda Punyatithi 2021: स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे विचार, जे तुमच्या विचारांना घालतील खत-पाणी

कोलकत्ता सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांनी शुक्रवार, 4 जुलै ४, 1902 रोजी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.

स्वामी विवेकानंद विचार (Photo Credits: File Photo)

थोर विचारवंत, मार्गदर्शक, युवकांचे प्रेरणा स्थान असे स्वामी विवेकानंद यांची उद्या पुण्यतिथी (Swami Vivekananda Punyatithi 2021). कोलकत्ता सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांनी शुक्रवार, 4 जुलै ४, 1902 रोजी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर जगाला मानवतेची शिकवण दिली. ते एक महान भारतीय हिंदू विचारवंत होते. वयाच्या अगदी लहानपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. पुढे रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ सुरू केले.

लहानपणीच विवेकानंद म्हणजेच नरेंद्रने सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. शिक्षणानंतर रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर नरेंद्रचे संपूर्ण जगच बदलले. त्यांनी हिंदू धर्म व भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभुमीवर, 11 सप्टेंबर 1893 सालचे त्यांचे शिकागो येथील भाषणाचे आजही दाखले दिले जातात.

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही अनमोल विचार पाहूया जे तुम्हाला, तुमच्या विचारांना नक्कीच खत-पाणी पुरवतील.

दरम्यान, स्वामी विवेकानंद यांनी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ सारख्या ग्रंथाची रचना करुन तरुण पिढीला नवीन मार्ग दर्शवला. अशाप्रकारे  वेदांत आणि योग यांच्या भारतीय तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्य जगात ओळख करुन देणारे ते महान पुरुष होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif