१२६ वर्षांपूर्वी असा सुरू झाला श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणेशोत्सव
पहा कसा सुरु झाला हा सोहळा
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी पुण्यातून केली आहे. त्यामुळे पुण्यात मानाच्या पाच गणपतींप्रमाणेच काही सार्वजनिक आणि जुन्या गणपती मंडळांनाही भेट देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. श्रीमंत दगडूशेठ गणपती हा पुण्यातील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. गणेशोत्सव व्यतिरिक्त इतर दिवशीही या गणपती मंडळाला भक्तांची मोठी गर्दी असते.
पुण्याची ओळख असणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती पुण्याच्या बुधवार पेठ परिसरात आहे. पण हा गणपती पुण्यात कसा स्थापन झाला यामागील कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे.
कसा सुरू झाला श्रीमंत दगडूशेठ गणपती ?
दगडूशेठ गडवे हे मूळचे कर्नाटकातील आणि व्यवसायाने हलवाई होते. ते कर्नाटकातून पुण्यात स्थायिक झाले होते. दगडूशेठच्या एकुलत्या एक मुलाचे निधन प्लेगच्या आजारात झाले होते. अकाली मुलाचं निधन झाल्यानं दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नीला जबर धक्का बसला होता. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अध्यात्मिक गुरूंची मदत घेतली होती. या गुरूंनी त्यांना गणेश मंदिर स्थापन करण्याचा मार्ग सुचवला.
एकुलत्या एका मुलाचं निधन झाल्यानंतर एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती स्थापन करा. यांचा अपत्याप्रमाणे सांभाळ करा. भविष्यात जशी मुलं पालकांचं नाव उज्ज्वल करतात त्याप्रमाणेच अपत्याप्रमाणे सांभाळलेली ही दोन दैवतच तुमचं नाव मोठं करतील असे अध्यात्मिक गुरूंनी सांगितले होते.
लोकमान्य टिळक हे दगडूशेठ यांचे चांगले मित्र होते. टिळकांनीही दगडूशेठांना मंदिर बांधण्यासाठी मदत केली.1893 साली मंदिर पूर्णपणे बांधून तयार झाले. दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांनी केली होती. यंदाचे वर्ष हे दगडूशेठ गणपती मंदिराचं १२६ वे वर्ष आहे.
गणपतीच्या दर्शानची वेळा काय ?
दगडूशेठचं दर्शन सकाळी सहा वाजता सुरू होते. सकाळी 6 ते 7.30 या वेळेत दर्शन सुरू असते. दगडूशेठ गणपती मंदिर रात्री 11 वाजता बंद केले जाते. येथे पहा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं लाईव्ह दर्शन येथे घ्या.
आरतीच्या वेळा
सकाळी 7.30 -7.45 या वेळेत सकाळची आरती केली जाते. सकाळच्या आरतीनंतर पुन्हा 8.15 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत गणपतीचं दर्शन सुरू असतं. या दरम्यानच दुपारची नैवेद्याची आरती होते. त्यानंतर 3 ते 3.15 या वेळेत मध्यान्ह आरती होते. रात्री 8-9 या वेळेत महामंगल आरती आणि 10.30 ते 10.45 या वेळेत शेज आरती होते. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात या 5 मानाच्या गणपतींचा असतो खास थाट !