Shivrajyabhishek Din 2025 Messages: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास मराठमोळे Images, Whatsapp Status, Greetings शेअर करून करा शिवरायांप्रति अर्पण करा कृतज्ञता

छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली.

Shivrajyabhishek Din 2025 Messages: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास मराठमोळे Images, Whatsapp Status,  Greetings शेअर करून करा शिवरायांप्रति अर्पण करा कृतज्ञता
Shivrajyabhishekh | File Image

6 जूनला तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ( साजरा केल्यानंतर आज शिवभक्त राज्यात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करत आहे. इतिहासातील नोंदींनुसार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता. त्यामुळे आज (9 जून) दिवशी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. तुमच्या शिवभक्त मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना तुम्ही सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes, Greetings च्या माध्यामातूनही शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करत महाराजांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करू शकता.

मुघल, निजामशाही, आदिलशाही यासारख्या परकीय आक्रमणांना शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवरायांचे हे केवळ मराठ्याचे बंड नसून ते साम्राज्य असल्याचा संदेश देण्यासाठी रायगडावर 6 जून 1674 ( ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ) राज्याभिषेक संपन्न झाला होता. गागाभट्टांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केला होता. या दिवशी मराठा साम्राज्याचा कारभार नियोजित पद्धतीने चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची देखील स्थापना करण्यात आली होती. नक्की वाचा: Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video).  

शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा

Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes
Shivrajyabhishek Diwas Wishes
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes
Shivrajyabhishek Diwas Wishes
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes
Shivrajyabhishek Diwas Wishes
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes
Shivrajyabhishek Diwas Wishes
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes
Shivrajyabhishek Diwas Wishes

 

  1. छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला.

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2025 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).