Shirdi Sai Baba Mahasamadhi 2020 Images: शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथीनिमत्त WhatsApp Stickers, Facebook Message आणि Greetings पाठवत साजरा करा उत्सव
Shirdi Sai Baba Mahasamadhi 2020 Images: हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक शिर्डीच्या साईबाबांच्या प्रति आपला विश्वास आणि आस्था ठेवतात. हेच कारण आहे की, साईबाबांच्या दरबारात नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली दिसून येते. असे म्हटले जाते की, श्रद्धा आणि सबुरीचे पाठ वाचणारे साईबाबा त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खाली हाताने पाठवत नाहीत. तर प्रत्येकाच्या इच्छा ते पूर्ण करतात. याच कारणास्तव साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो लोक शिर्डीत येतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांना उपस्थितीत राहता येणार नाही आहे.
प्रत्येक वर्षी शिर्डीतील साईबाबा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव हा विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी साजरी केली जाते. त्याला शिर्डी साईबाबा महासमाधी दिवस नावाने ओखळले जाते. येत्या 25 ऑक्टोंबरला साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार साईबाबा यांनी 15 ऑक्टोंबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी महासमाधी घेतली होती. तर यंदाच्या शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथीनिमत्त WhatsApp Stickers, Facebook Message आणि Greetings पाठवत साजरा करा उत्सव.(Shirdi Sai Baba Punyatithi 2020 Date: साई बाबांची पुण्यतिथी यंदा कधी? येथे पहा, पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वेळापत्रक)
WhatsApp Message: शोभूनी दिसे द्वारकामाई,
तिथे बसले होते सद्गुरु साई
चिंता सर्वांची दुर कराया,
धावुनी येई भक्तांच्या ठाई...!!
WhatsApp Message: ''अनंत कोटी ब्रम्हांडनायक
महाराजा धिराज योगीराज
परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की जय''
WhatsApp Message: सकाळ हसरी असावी
साईंची मूर्ती नजरे समोर दिसावी
मुखी असावे साईंचे नाम
सोपे होई सर्व काम
ॐ साई राम!!
शिर्डीतील साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही व्हॉट्सअॅप, मेसेजच्या माध्यमातून स्टिकर्स सुद्धा पाठवू शकता. हे स्टिकर्स तुम्हाला Play Store येथे उपलब्ध आहेत. अॅन्ड्रॉइड युजर्संनी हे स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर यंदाच्या शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हा सर्वांना आशीर्वाद मिळो हिच सदिच्छा.