Shani Jayanti 2019: शनि जयंती दिवशी चुकूनसुद्धा 'या' गोष्टी करु नका, आयुष्यभर साडेसाती मागे लागेल
शनिदेव सर्व ग्रहांमध्ये निपक्ष न्याकारी होण्यासोबत सर्वात जास्त खतरनाक ग्रहांमधील एक ग्रह मानला जातो.
Shani Jayanti 2019: यंदा शनि जयंती येत्या 3 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. शनिदेव सर्व ग्रहांमध्ये निपक्ष न्याकारी होण्यासोबत सर्वात जास्त खतरनाक ग्रहांमधील एक ग्रह मानला जातो. सूर्य पुत्र शनिदेवाच्या चुकीच्या कामांमुळे त्याच्यावर कधीच प्रसन्न होत नाही.
त्यामुळे असे मानले जाते की, शनि जयंती दिवशी कोणतेही असे कार्य करु नये, जेणेकरुन शनिदेव तुमच्यावर नाराज होईल. नाहीतर व्यक्तीला आयुष्यभर साडेसाती मागे लागते असे म्हटले जाते.साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिजयंती चा दिवस अतिशय उत्तम योग आहे. यादिवशी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या उपायांचे फळ नक्कीच मिळते.
शनि जयंती दिवशी चुकूनसुद्धा 'या' गोष्टी करु नका:
-शनि जयंती दिवशी चुकूनसुद्धा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करुन देऊ नये. असे केल्यावर व्यक्तीवर कर्जाचे ओझे येते.
-तसेच तांब्यांचे भांडे कोणाला दान करु नये. त्यामुळे व्यापारात नुकसान होते.
-चांदी, लोखंड किंवा स्टील यांच्यापासून बनलेली कात्री कोणाला भेट करु नक. या कारणामुळे नात्यात भांडण होतात.
-शनि जयंती दिवशी कोणत्याही व्यक्तीला कारण नसतानाही त्रास देऊ नये. तसेच खोटे बोलणे टाळावे.
-या दिवशी एखाद्या व्यक्तीला चाफ्याचे अत्तर खरेदी करुन देऊ नका. नाहीतर आयुष्यभर विविध आजार पाठी लागतात.
ज्योतिषशास्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला आनंदी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी त्याला आयुष्यातून तीन वेळाा शनि दशेच्या मार्गाचा सामना करावा लागतो. पहिल्या वेळेस शनि व्यक्तीच्या आयुष्यासोबत खेळतो, दुसऱ्या वेळेस आयुष्यात खुप व्यथा पाठी लावतो आणि शेवटच्या तिसऱ्या वेळेस त्या व्यक्तीचा सर्व धनपैसा संपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच बहुधा लोक शनिवारच्या दिवशी शनिची शांती करण्याचा प्रयत्न करतात.