Makar Sankranti 2025 Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी तुमच्या मैत्रिणींनी पाठवा 'या' खास निमंत्रण पत्रिका!
मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती झाल्यानंतर महिला आपल्या घरी हळदी-कूंकवाचा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमात त्या एकमेकींना वाण देत आशीर्वाद घेतात. तुम्ही देखील संक्रांतीनिमित्त तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत.
Makar Sankranti 2025 Haldi Kunku Invitation Format in Marathi: दरवर्षी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2025) सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवस मोठा होता. देशभरात मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. विवाहित महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण खूप खास असतो. कारण, या दिवशी महिला एकमेकांना हळदी-कुंकू लावून वाण देतात. तसेच आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांचे आशीर्वाद घेतात.
महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी महिला एकमेकींना भेटवस्तू म्हणून वाण देतात. ही भेटवस्तू दररोज लागणाऱ्या कोणत्याही वस्तूंपैकी एक असते. महाराष्ट्रात वाण देण्याची परंपरा खूप जूनी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती झाल्यानंतर महिला आपल्या घरी हळदी-कूंकवाचा कार्यक्रम ठेवतात. या कार्यक्रमात त्या एकमेकींना वाण देत आशीर्वाद घेतात. तुम्ही देखील संक्रांतीनिमित्त तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे (Haldi Kunku Ceremony) आयोजन केले असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास निमंत्रण पत्रिका ( Cards) घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे या निमंत्रण पत्रिका पाठवून तुमच्या मैत्रिणींना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला आमंत्रण (Haldi Kunku Invitation) देऊ शकता. (हेही वाचा -Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांती असो वा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम...या निमित्ताने घ्या 'हे' हटके उखाणे)
मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण पत्रिका -
नमूना क्रमांक - 1
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमच्या येथे दि. 15.01.2025 सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
नमूना क्रमांक - 2
दरवर्षी प्रमाणे यंदाही
सोसायटीमधील सर्व महिलावर्गासाठी
मकरसंक्राती मधील हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत त्याची शोभा वाढवावी
विनित,
दिनांक-
स्थळ -
नमूना क्रमांक - 3
विसरून जा सारे जुने वाद
संक्रातीच्या निमित्ताने
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात
सहभागी होत करू नवी सुरूवात
स्थळ -
वेळ-
तारीख-
नमूना क्रमांक - 4
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
स्थळ -
वेळ-
तारीख-
नमूना क्रमांक - 5
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ -
तारीख/ वेळ -
मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही 4 फेब्रुवारीपर्यंत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. रथसप्तमी पहाटे 4:37 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 वाजता संपेल.
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2025 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

