Savitribai Phule Death Anniversary 2022 Images: सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा आदरांजली अर्पण करण्यासाठी फोटोज!

आज त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी काही फोटोज, मेसेजेस नक्की शेअर करा सोशलमीडीयामध्ये.

Savitribai Phule Punyatithi | PC: File Images

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं समाजाच्या जडण घडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरसावणार्‍या प्रत्येक स्त्रीला त्यांचा अभिमान आहे. आज 10 मार्च हा सावित्रिबाईंच्या पुण्यतिथीचा दिवस (Savitribai Phule Death Anniversary). 1897 मध्ये सावित्रीबाईंचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला. पति ज्योतिबांच्या पश्चात समाजसुधारणेसाठी त्यांनी अविरत काम सुरू ठेवले. आज मुलींना शिक्षणाची दारं खुली आहेत त्याची मुहूर्तमेढ सावित्रीबाईंनी बांधली आहे. मग आजक्च्या या सावित्रिबाई फुले स्मृतिदिनी त्यांच्या कार्याप्रति आदरभाव व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे काही फोटोज तुम्ही सोशल मीडीयामध्ये शेअर करू शकता.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख पुढल्या पिढीला व्हावी म्हणून आजच्या या दिवशी तुम्ही सोशल मीडीयात व्हॉट्सॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजद्वारे त्यांचे फोटोज शेअर करू शकता. नक्की वाचा: Savitribai Phule Death Anniversary: स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांच्या समाज कार्याविषयी .

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

 

Savitribai Phule Punyatithi | PC: File Images
Savitribai Phule Punyatithi | PC: File Images
Savitribai Phule Punyatithi | PC: File Images
Savitribai Phule Punyatithi | PC: File Images
Savitribai Phule Punyatithi | PC: File Images

समाजाच्या विचारसरणी पासून दूर जात ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले. त्या दरम्यान फुले यांना खुप संघर्ष करावा लागला होता. तरीही लोकांच्या शिव्याशापांकडे दुर्लक्ष करत फुले यांनी सावित्रीबाई यांचे नाव शाळेत दाखल केले. सावित्रीबाई यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजातील अन्य महिलांनासुद्धा शिक्षण देण्याचा निर्धार केला.मात्र समाजातील रुढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी महिलांना यशस्वीपणे शिक्षण दिले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 8 ऐवजी 10 मार्चला महिला दिन साजरा करतात.