Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Messages

आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला वंदन करून कुटुंब व मित्रांचा दिवस मंगलमय वातावरणामध्ये सुरू करण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं नक्की शेअर करा.

Sankashti Chaturthi puja

Sankashti Chaturthi August 2026: संकष्ट चतुर्थी हे हिंदू धर्मातील गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. प्रत्येक चांद्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असते. या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केली जाते. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची आराधना केल्याने सर्व संकटे, अडथळे आणि विघ्न दूर होतात अशी श्रद्धा आहे. मग तुमच्या घरातील मंडळींना, नातेवाईकांना आजच्या संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देत त्यांच्या दिवसाची मंगलमय सुरूवात करण्यासाठी खास शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Images शेअर करायला विसरू नका.

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविक पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि दिवसभर निर्जळी किंवा उपवास ठेवतात. सकाळी गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावून, हळद-कुंकू, जास्वंदाची फुले, दुर्वा वाहून पूजा केली जाते.

संकष्टी चतुर्थीच्या गणेश भाविकांना शुभेच्छा

Sankashti Chaturthi festival wishes in Marathi
Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi puja
Lord Ganesha blessing image for Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi Wishes

संपूर्ण दिवस उपवास ठेवल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाची वाट पाहिली जाते. चंद्रदर्शन झाल्यावर चंद्राला अर्घ्य दिले जाते आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो. या दिवशी मोदक, उकडीचे मोदक किंवा गणपतीच्या आवडीचा नैवेद्य दाखवला जातो. आज मुंबई मध्ये संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय 21.37 वाजताची आहे. रात्री बाप्पाला नैवेद्य दाखवून दिवसभराचा उपवास सोडला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement