Republic Day Of India 2024: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी WhatsApp, Facebook, Twitter, Instagram Account वर तिरंगा Profile Picture म्हणून कसा ठेवाल?

दर वर्षी 26 जानेवारी दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.

Republic Day Of India 2024: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी WhatsApp, Facebook, Twitter, Instagram Account वर तिरंगा  Profile Picture म्हणून कसा ठेवाल?
Indian national flag (File and Representative Image)

26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day Of India) आहे. 26 जानेवारी 1950 दिवशी भारताने संविधान (India Constitution) अंमलात आणल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते. मग हा देशाप्रति गौरवाचा दिवस सोशल मीडीयातही साजरा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram), ट्वीटर (Twitter), फेसबूक(Facebook) वरही तिरंगा डीपी ठेवत तुम्ही या दिवसाचं सेलिब्रेशन थोडं खास करू शकता. भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानी डिझाईन केला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते. Tiranga DP Images, HD Wallpapers for Free Download Online: सोशल मीडीयामध्ये प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' ठेवण्यासाठी डाऊनलोड करा 'भारतीय राष्ट्रध्वज' फोटो! 

भारताला ब्रिटीश राजवटीपासून 15ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा मोठा वाटा होता. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29ऑगस्ट 1947  ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. आणि नंतर हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून स्वीकारले गेले.

WhatsApp Profile फोटो कसा बदलायचा?

व्हॉट्सअ‍ॅप वर फोटो बदलण्यासाठी तुमच्या डिव्हाईस वर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

नंतर आयाफोन युजर्स Setting च्या पर्यायावर जाऊन तर अ‍ॅन्ड्रॉईद युजर्स 3 डॉटेड आयकॉनवर वर क्लिक करून डीपी बदलू शकता.

यानंतर तुमचा डीपी दिसेल त्याला क्लिक करा.

Edit वर क्लिक करून Choose Photo चा पर्याय निवडा आणि तेथे तिरंग्याचा फोटो सेट करा.

फेसबूक प्रोफाईल फोटो कसा बदलाल?

फेसबूक वरही डीपी बदलण्यासाठी त्याचं अ‍ॅप ओपन कारा.

तुमच्या फोटोवर क्लिक करा.

सिलेक्ट प्रोफाईल फोटो वर क्लिक करून तिरंग्याचा फोटो अपलोड करा. नंतर तो सेव्ह करा.

इंस्टाग्राम वर डीपी फोटो कसा बदलाल?

इंस्टाग्राम ओपन करून तुमच्या युजरनेमच्या बाजूला असलेल्या 'Edit Profile' चा पर्याय निवडा.

सेटिंग अ‍ॅन्ड प्रायव्हसी सिलेक्ट करा. अकाऊंट सेंटर निवडा तुमचं प्रोफाईल निवडा.

त्यानंतर प्रोफाईल पिक्चर मध्ये जाऊन तेथे डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करा.

ट्वीटर वर कसा बदलाल डीपी फोटो ?

ट्वीटर वर फोटो बदलण्यासाठी देखील तुमच्या डीपी वर क्लिक करा.

नंतर प्रोफाईल सिलेक्ट करा. एडीट प्रोफाईल चा पर्याय निवडा.

आता डीपी बदलण्यासाठी तेथे क्लिक करून तिरंगा निवडा.

तुमचा नवा डीपी सेव्ह करा.

दर वर्षी 26 जानेवारी दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. ध्वजारोहण,21 तोफांची सलामी, बिटिंग रिट्रीट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या द्वारा भारतीय 26 जानेवारीचा दिवस साजरा करतात.

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2024 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).