Rang Panchami 2020 Wishes: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा रंगोत्सव!
मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची नव्हे तर होळीच्या राखेने धुळवड खेळण्यात येते. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी बहुतांश ठिकाणी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची नव्हे तर होळीच्या राखेने धुळवड खेळण्यात येते. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात. तर धुळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस वेगळे असीन फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. तर 13 मार्चला रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर रंगाचा हा आनंदी सण साजरा करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पुराणात सांगितलेल्या कथा आणि वैज्ञानिक कारणांनुसार होलिकादहन किंवा होळी सण हा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. पाच दिवस होळीचा अग्नी पेटता ठेवून वातावरणातील विनाशी गोष्टी, शक्तींचा नाश केला जातो. त्यानंतर सुरू झालेल्या नव्या युगाचं सेलिब्रेशन हे रंगांची उधळण करून केले जाते. तर यंदाच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!(Holi 2020: धुळवड, रंगपंचमी खेळण्यासाठी घरच्या घरी आकर्षक नैसर्गिक रंग कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोपे पर्याय)
>>नको नासाडी पाण्याची होळी खेळू कोरड्या रंगाची
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही वेगळे रंगांनी, रंग स्वत: च्या विसरुनी
एकीचे महत्व सांगतात!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>रंग लागू दे, स्नेह जागू दे
नाती जोडू चला
उल्हासाने हा रंग
उत्सव मनवू चला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>ऋणानुबंधाचे रंग मनातील उधळू आता नभी चला
विसरुनी सारे भेदभाव रंग बेरंग होऊ चला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>खुलून येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंग
होळीच्या रंगांनी बहरु द्या तुमचे अंतरंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
GIF's
रंगपंचमी दिवशी प्रामुख्याने अबीर आणि गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा तुम्ही रंगपंचमी दिवशी तुम्ही देखील रंगाची उधळण करणार असाल तर नैसर्गिक रंगाचा वापर करा म्हणजे तुमच्यासोबत पर्यावरणाचेही नुकसान कमी होण्यास मदत होईल.