Ramzan 2020 Moon Sighting in India Live News Updates: रमजानचा चंद्र दिसला, 25 एप्रिलपासून संपूर्ण भारतात पवित्र रमजानला सुरुवात

मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या रमजानच्या सणाला भारतातील काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. गुरुवारी भारताच्या काही ठिकाणी रमजान महिन्याच्या सुरुवातीचा चांद दिसल्याने हा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

25 Apr, 01:39 (IST)

दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि कोलकाता येथे रमजानचा चंद्र दिसल्याची हिलाल समित्यांनी घोषित केली. यासह देशभरातील सर्व मुस्लिम बांधव उद्यापासून रमजानच्या पाक महिन्याच्या उपवासाला सुरुवात करतील. केरळ आणि कर्नाटकमध्ये आजपासून रमजानची सुरुवात झाली. LatestLY कुटुंबाकडूम आमच्या सर्व वाचकांना शुभेच्छा! रमजान मुबारक

25 Apr, 01:29 (IST)

रमजानचा पवित्र महिना उद्यापासून भारतात सुरु होणार आहे. या पवित्र महिन्यासाठी दिल्लीतील जामा मशीद प्रकाशमय झाली आहे. 

25 Apr, 01:22 (IST)

चेन्नईमध्येही रमजान अर्धचंद्र पाहिला गेला आहे. उद्यापासून इतर सर्व राज्यांसह तामिळनाडू राज्यात उपवासाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे.

25 Apr, 01:16 (IST)

दिल्लीत रमझान अर्धचंद्र पाहिला गेला आहे, अशी पुष्टी राष्ट्रीय राजधानीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमाम यांनी दिली. उद्यापासून उपवासाला सुरुवात होईल. मुंबईमध्ये हिलाल समितीकडून अद्याप घोषणेची प्रतीक्षा आहे.

25 Apr, 01:13 (IST)

लखनौमध्ये रमजानचा चंद्र दिलासा असल्याचे शीर्ष मौलवी मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली. ते हिलाल समितीचे देखील एक सदस्य आहेत. उद्यापासून उत्तर प्रदेशात उपवासाला सुरुवात होईल.

25 Apr, 01:07 (IST)

अजमेरमध्येही चंद्रकोर पहिला गेल्याची पुष्टी दर्गा शरीफ अधिकाऱ्यांनी दिली. राजस्थान राज्यातही उद्या, 25 एप्रिलपासून उपवासाला सुरुवात होणार आहे.

25 Apr, 01:05 (IST)

मुंबईच्या माझगावमधून रमजानचा चंद्र दिसला. संपूर्ण मुंबई विभागात चंद्रकोर दिसला आहे आणि उद्यापासून उपवासाला सुरुवात होईल असा सुरक्षितपणे निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

25 Apr, 24:58 (IST)

मुंबईत रमजानच्या चंद्राचे दर्शन झाले आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर भागात राहणाऱ्या मुस्लिमांनी चंद्रकोर पाहिला. हिलाल समितीकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.

25 Apr, 24:50 (IST)

हैदराबाद, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रमझान अर्धचंद्र पहायला मिळाला आहे. उद्यापासून रमजानच्या महिन्याला सुरुवात होईल.

25 Apr, 24:47 (IST)

अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) च्या भागलपूर युनिटने रमजान चंद्र दिसल्याची पुष्टी केली आहे. उद्यापासून बिहारमध्ये रमजानचा महिना सुरु होईल.

25 Apr, 24:43 (IST)

भागलपूर आणि कानपूर येथे चंद्रकोर दिसला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उद्यापासून रमजानचा महिना सुरू होणार आहेत. इतर राज्य घोषणेच्या प्रतीक्षेत आहे. 

25 Apr, 24:23 (IST)

जामा मशिदीचे शाही इमाम आज दिल्लीत मगरिबच्या नमाजनंतर घोषणा करतील तर मुंबई, लखनौची हिलाल कमिटी थोड्याच वेळात करणार घोषणा  

25 Apr, 24:04 (IST)

 

कोलकाता येथील मघरीबीची प्रार्थना संपली असून थोड्याच वेळात हिलाल समिती घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत लखनौ आणि चैन्नईत सुद्धा या संदर्भातील घोषा केली जाऊ शकते. 

24 Apr, 23:57 (IST)

रमजानच्या पार्श्वभुमीवर  हिलाल समुदायाची मुंबई, अजमेर, चेन्नई आणि पटना येथे बैठकीला सुरुवात झाली आहे. 


Ramzan Moon Sighting 2020: मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या रमजानच्या सणाला भारतातील काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. गुरुवारी भारताच्या काही ठिकाणी रमजान महिन्याच्या सुरुवातीचा चांद दिसल्याने हा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. इस्लामिक कॅलेंडनुसार सुरु महिन्याच्या 29 व्या दिवशी चंद्र दिसला की पुढील नवव्या महिन्याची सुरुवात होते. मात्र जर चंद्रच दिसला नाही तर महिन्याचे 30 दिवस पूर्ण होतात. Moroccan खगोलशास्त्रज्ञ Abdelaziz Kharbouch Al Ifrani च्या माहितीनुसार यंदा रमजान महिना सौदी अरेबिया, युएई, कतार, कुवेतसह इतर आखाती देशांमध्ये 24 एप्रिलपासून सुरू होईल. मलेशियाने 23 एप्रिल दिवशी चंद्रकोर पाहिली जाईल असे सांगितलं आहे.

हलाल समुदायाकडून मुंबई, दिल्ली, लखनौ, अजमेर, भोपाळ, हैदराबाद आणि चैन्नईत रमजानचा चंद्र पाहण्यासाठी उलेमा आणि नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत.(Ramadan Iftar, Sehri Timetable 2020 For Mumbai: मुंबई शहरातील यंदा रमजान महिन्यातील सेहरी आणि इफ्तारच्या वेळांंचंं इथे पहा संपूर्ण वेळापत्रक!)

रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्याभराच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास पाळतात. या काळात त्यांना सकाळी सूर्योदयापूर्वी आणि रात्री सूर्यास्तानंतर अन्न पाणी घेण्याची मुभा असते. या महिन्याची सांगता रमजान ईद ने होते. त्यादिवशी सारे जण एकत्र येतात. गोडा-धोडाच्या पदार्थांसोबत एकमेकांना ईदी देतात. परंतु सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाचा रमजानच्या सण नागरिकांनी घरीच साजरा करावा असे आवाहन धर्मगुरुंनी केले आहे. त्याचसोबत नागरिकांनी रमजानच्या काळात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियामाचे पालन करावे असे ही सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement