Ramadan Mubarak 2020 Wishes: रमजान महिन्याच्या शुभेच्छा देणारी Greetings, Messages, GIFs, Images शेअर करून मुस्लीम बांधवांचा खास करा Ramadan Kareem चा पहिला दिवस!
मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या आणि पहिल्या रोझ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस, शुभेच्छापत्र, विशेस, ग्रीटींग्स!
Ramzan Mubarak 2020 Wishes: मुस्लिम बांधवांसाठी खास असलेल्या रमजान महिन्याला भारतासह जगभरातील काही देशांमध्ये सुरूवात झाली आहे. काल (23 एप्रिल) च्या रात्री चांद दिसल्यानंतर आता दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक प्रांतामध्ये आज पासून रमजान महिना (Ramzan) आणि रोझा (Roza) ठेवण्याला सुरूवात झाली आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये मुंबई सह महाराष्ट्राच्या विविध भागातही रमजानच्या सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आज नेटकर्यांनी 'रमजान मुबारक' (Ramadan Mubarak) , 'रमजान करीम'(Ramadan Kareem) म्हणत मुस्लिम कॅलेंडरनुसर सुरू झालेल्या या नवव्या महिन्याची सुरूवात दणक्यात केली आहे. पण यंदा रमजान महिन्याच्या पवित्र आणि मंगलपर्वावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मग तुम्हांला आज तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटता येत नसेल तर खास रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी 'लेटेस्टली' कडून तयार करण्यात आलेली ही खास हिंदी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, विशेज, GIFS, HD Images शेअर या नव्या महिन्याच्या शुभेच्छा द्या आणि तुमचा आनंद द्विगुणित करा.
भारतासह देशा परदेशामध्ये 24-25 एप्रिल पासून पुढील 30 दिवस रमजान महिना पाळला जाणार आहे. इस्लामिक धर्माच्या शिकवणीनुसार रमजान हा एक पवित्र महिना असून या महिन्यात मुस्लिम धर्मियांना रोझा म्हणजे कडक उपवास ठेवायचा असतो. रोझा ठेवणारी व्यक्ती सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अन्न-पाणी घेऊ शकते. यामध्ये सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तारची वेळ पाहून रोझा पाळला जातो. Ramadan 2020: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून.
रमजान मुबारक
मजहब की दीवार पर इंसानियत का लहजा रखा,
इस रमजान तुम्हारे लिए हमनें भी रोजा रखा.
रमजान मुबारक!
मुबारक हो आपको खुदा की दी यह जिंदगी,
खुशियों से भरी रहे आपकी यह जिंदगी,
गम का साया कभी आप पर न आए,
दुआ है यह हमारी आप सदा यूं ही मुस्कुराएं,
रमजान मुबारक !
चांद से रोशन हो रमजान तुम्हारा,
इबादत से भर जाए रोजा तुम्हारा,
हर नमाज हो कबूल तुम्हारी,
बस यही दुआ है खुदा से हमारी.
रमजान मुबारक !
ऐ माह-ए-रमजान आहिस्ता चल,
अभी काफी कर्ज चुकाना है,
अल्लाह को करना है राजी और गुनाहों को मिटाना है,
ख्वाबों को लिखना है और रब को मनाना है.
रमजान मुबारक !
आसमान पे नया चांद है आया,
सारा आलम खुशी से जगमगाया,
हो रही है सहर-ओ-इफ्तार की तैयारी,
सज रही हैं दुआओं की सवारी,
पूरे हो आपके दिल के हर अरमान,
मुबारक हो आप सब को प्यारा रमजान.
रमजान मुबारक !
रमजानच्या शुभेच्छा देणारी GIFs
रमजान महिना हा मुस्लिम धर्मियांसाठी स्वयंशिस्त, संयम शिकवणारा आहे. या काळात इतरांना त्रास होईल अशा विनाशी विचार, कृतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याप्रमाणेच महिनाभर मुस्लिम बांधवांना घालून दिलेल्या नियमांचंही विशेष पालन करायचं असतं. दरवर्षी मुंबईसह देशभरात रमजान महिन्यात स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते. मात्र यंदा घरच्या घरीच रमजान साजरा करण्याचं, रमजान महिन्यातील नियमित नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना पासून सार्यांचंच रक्षण करायचे असेल तर यंदा रमजान घरगुती स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.