Ram Navami 2022 HD Images: 'राम नवमी'निमित्त खास मराठी Greetings, Wallpapers, Wishes, Messages शेअर करून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत पुरूष सदाचरणी राहु शकतो याचे रामचंद्र प्रभु एक जिवंत उदाहरण आहे

Rama Navami 2022 (File Image)

चैत्र शुद्ध नवमीला सूर्य माथ्यावर आल्यावर ठीक दुपारी 12 वाजता अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी प्रभू श्रीराम (Shri Ram) यांचा जन्म झाला होता. हा दिवस ‘राम नवमी’ (Rama Navami 2022) म्हणून साजरा केला जातो. यंदा 10 एप्रिल 2022 रोजी राम नवमीचा उत्सव साजरा होणार आहे.  या दिवशी दुपारी 12 वाजता कुंची घातलेला नारळ किंवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेऊन, प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला हळद कुंकू लावून पूजा करतात. चंपा, चमेली, केवडा, जुईची फुले रामाला अर्पण करून राम जन्मोत्सवाचा पाळणा म्हटला जातो. नंतर आरती करून प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.

संपूर्ण देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. जेव्हा जेव्हा दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा उच्छाद वाढला तेव्हा पृथ्वीवासीयांचे रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी भूतलावर अवतार धारण केला. प्रभू श्रीराम हे सुध्दा श्री विष्णूचाच सातवा अवतार आहेत.

असे मानले जाते की जे लोक राम नवमीची उपासना करून दैवी शक्ती प्राप्त करतात, त्यांच्या जीवनातून सर्व वाईट शक्ती निघून जातात. हा दिवस स्वत: ला शुद्ध करण्याचा सण मानला जातो. हा संपूर्ण दिवस भजन स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो. तर या मंगलमय दिवशी शेजाऱ्यांना, मित्रांना, जवळच्या लोकांना खास Messages, Images, HD Images, Wishes पाठवून राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Rama Navami 2022
Rama Navami 2022
Rama Navami 2022
Rama Navami 2022
Rama Navami 2022

(हेही वाचा: रामनवमीसाठी खास सोप्या रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडीओ)

दरम्यान, मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत पुरूष सदाचरणी राहु शकतो याचे रामचंद्र प्रभु एक जिवंत उदाहरण आहे. प्रभू श्रीराम एक आदर्श पुरुष तर होतेच, तसेच ते एकवचनी, एक बाणी आणि एकपत्नी होते. मातृ-पितृभक्ती, बंधुप्रेम, सत्य-वचन, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच ज्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी असते अशा आदर्श राज्याला ‘रामराज्य’ म्हणतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Birth Anniversary Of Lord Ram Festivals and Events Happy Ram Navami Happy Ram Navami 2022 Happy Ram Navami Hd Images Happy Ram Navami Images Happy Ram Navami messages Happy Ram Navami Wishes Lord Ram Lord Ram Birthday navami Ram Janmotsav Ram Navami Ram Navami 2022 Ram Navami 2022 Greetings Ram Navami 2022 Messages Ram Navami 2022 Wallpapers Ram Navami 2022 Wishes Ram Navami Celebration Ram Navami chya Hardik Shubhechha Ram Navami Date Ram Navami DP for WhatsApp Ram Navami food Ram Navami Greetings Ram Navami HD images Ram Navami History Ram Navami Images Ram navami images marathi ram navami kab hai Ram Navami madhyanha muhurat Ram Navami Messages Ram Navami Photos Ram Navami Quotes Ram Navami Quotes in marathi Ram Navami Rituals Ram Navami Shubh Muhurat Ram Navami Significance Ram Navami Sms Ram Navami Status in Marathi Ram Navami Tithi ram navami vrat Ram Navami Wallpapers Ram Navami Wishes Ram Navami Wishes 2022 Ram Navami Wishes in Marathi Ram navami wishes marathi Ram Navmi Ram Navmi 2022 Ram Navmi Wishes 2022 Rama Navami Rama Navami 2022 HD Images sri ram राम नवमी राम नवमी इमेजेस राम नवमी ग्रिटिंग्स राम नवमी मेसेजेस राम नवमी शुभेच्छा राम नवमी संदेश राम नवमी स्टेटस राम नवमीच्या शुभेच्छा राम नवमीच्या शुभेच्छा 2022 रामनवमी 2022 रामनवमीच्या पवित्र शुभेच्छा रामनवमीच्या शुभेच्छा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री राम नवमी मराठी शुभेच्छा श्री राम नवमी शुभेच्छा श्रीराम नवमी श्रीराम नवमी 2022 श्रीराम नवमी फोटो श्रीराम नवमी मराठी मेसेज श्रीराम नवमी मराठी शुभेच्छा श्रीराम नवमी मराठी संदेश श्रीराम नवमी व्हॉट्अप स्टेटस श्रीराम नवमीच्या शुभेच्छा श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा सण आणि उत्सव


Share Now