Ram Navami 2019: रामनवमी निमित्त प्रसादाला 'सुंठवडा' का दिला जातो?

राम नवमी निमित्त प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. परंतु, प्रसादाला सुंठवडा देण्यामागचे नेमके कारण काय? तो चिमूटभरच का दिला जातो? त्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत का?

Rama Navami Prasad Sunthavada (Photo Credits: File Photo)

Rama Navami Prasad 'Sunthavada' Health Benefits: चैत्र शुक्ल नवमीला रामाचा जन्म सोहळा देशभरात साजरा केला जातो. रामनवमीनंतर अवघ्या आठवड्याभरातच रामाचा दास असलेल्या हनुमानाची जयंती साजरी केली जाते. या दोन्हीही दिवशी प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. परंतु, प्रसादाला सुंठवडा देण्यामागचे नेमके कारण काय? तो चिमूटभरच का दिला जातो? त्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत का? जाणून घेऊया...

रामनवमी आणि हनुमान जयंती हे दोन्हीही उत्सव चैत्र महिन्यात येतात. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात.  प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरणही पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे. (रामनवमी का साजरी करतात?)

आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. त्यामुळे एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो. (रामनवमीसाठी खास भगवान श्रीरामाची गाणी)

सुंठाचे फायदे:

कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.

सुंठवडा कसा बनवावा?

सुंठवडा बनवण्यासाठी सुंठ, खोबरं, खडीसाखर भाजून मग बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही त्यात खसखस घालून व्हेरिएशन आणू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now