Pandharpur Wari 2019: आषाढी वारीकरिता विठ्ठल मंदिराला रोषणाई, मंदिराला राजवाड्याचे रुप

आढाष वारीला सुरुवात झाली असून हजारोंच्या संख्येने वारकारी हळूहळू पंढरपूरच्या(Pandhrpur) दिशेने प्रस्थान करत आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आढाष वारीला (Ashadhi Ekadashi ) सुरुवात झाली असून हजारोंच्या संख्येने वारकारी हळूहळू पंढरपूरच्या(Pandhrpur) दिशेने प्रस्थान करत आहेत. तर जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने जात आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील विनोद जाधव नावाच्या भक्ताने विठ्ठलाच्या मंदिराला भव्यदिव्य अशा पद्धतीची रोषणाई केली आहे.

मंदिराला करण्यात आलेली रोषणाई ही एखाद्या राजवाड्यासारखी करण्यात आली आहे. तर रोषणाईचे काम पूर्ण करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.तर आजपासून या रोषणाईमुळे मंदिर परिसर अधिक खुलून दिसणार आहे. तप पहिल्यांदाच मंदिराच्या मंदिराच्या आतील बाजूनेसुद्धा रोषणाई करण्यात आले असून उंच झुंबर लावण्यात आले आहेत. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा पाहण्याजोगे झाला आहे.(Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे शहरात; दगडूशेठ गणपती मंदिराला विशेष सजावट)

गेल्या चार वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीची रोषणाई करण्यात येत आहे. तर नामदेव पायरीजवळ LED दिव्यांची आरास केली आहे. मात्र यंदाची रोषणाई अधिकच आकर्षक ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.