Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक
या नवरात्रीची सुरूवात केशरी तर शेवट मोरपंखी रंगाने होईल.
Navratri 9 Days Colours 2019: हिंदू धर्मीय अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी या नऊ रात्रींमध्ये देवीची पूजा करून नवरात्र (Navratri) साजरी करतात. यंदा ही शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2019) 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019 या दिवसांमध्ये साजरी करणार आहेत. तर विजया दशमी म्हणजे दसरा 8 ऑक्टोबर दिवशी आहे. तरूणी आणि सुवासिनी स्त्रियांसह महिलावर्गामध्ये नवरात्रीचं एक प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे नवरात्रीचे नऊ रंग़ (Navratri Colours 2019). स्त्री शक्तीचा जागर समानतेमधून करण्यासाठी या नऊ दिवसामध्ये सार्या महिला प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करतात. स्त्रीयांमधील एकता एका अनोख्या पद्धतीने समोर आणण्यसाठी असलेली ही चलाखी आता फॅशन स्टेटमेंट झाली आहे. घटस्थापनेपूर्वीच अनेक महिला नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे कपड्यांची तयारी करून ठेवतात. मग यंदा तुमचीही नवरात्रीची तयारी सुरू झाली असेल तर पहा नवरात्रोत्सव 2019 मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे?
सामान्यतः घटस्थापनेदिवसापासून जो वार असेल त्यानुसार पुढील नऊ दिवसात कोणते रंग़ घालायचे याचं गणित ठरवलं जातं. त्यामुळे या नवरंगामागे शास्त्र नसून सणानिमित्त एकाजूटीची भावना निर्माण करण्याचा हेतू आहे. त्यानंतर यंदा घटस्थापना 29 सप्टेंबर म्हणजे रविवारी असल्याने या पहिल्या दिवसाचा रंग केशरी/ नारंगी आहे. दुसर्या दिवशी पांढरा, तिसर्या दिवशी लाल, चौथ्या दिवशी रॉयल ब्लू म्हणजे निळा, पाचव्य दिवशी पिवळा, सहाव्या दिवशी हिरवा, सातव्या दिवशी करडा, आठव्या दिवशी जांभळा तर नवव्या दिवशी यंदा मोरपंखी रंग असेल. Navratri 2019 Wishes: घटस्थापना आणि नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन जल्लोषात साजरा करा शारदीय नवरात्र उत्सव.
नवरात्र 2019 च्या नऊ रंगांचं संपूर्ण वेळापत्रक
महाराष्ट्रासह नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि,महागौरी, सिद्धिदात्री अशा नऊ अवतारांची पूजा केली जाते. काही ठिकाणी नऊ रंगांमध्ये या नऊ अवतारांची सजावट केली जाते. त्यामुळे तुम्हीही आत्तापासून तयारीला लागा आणि यंदाच्या नवरात्रीसाठी तुमच्या कपाटामध्ये या नऊ रंगांचे कपडे सज्ज ठेवा.