Shardiya Navratri 2021 Date: 7 ऑक्टोबरला घटस्थापना; यंदा नवरात्र 8 दिवसांची
यंदा दसरा 15 ऑक्टोबर दिवशी आहे.
गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम संपली की सहाजिकच अनेकांना नवरात्रोत्सवाचे (Navratrotsav) वेध लागतात. यंदा नवरात्री नऊ ऐवजी आठ दिवसांची आहे. तिथी क्षय झाल्याने यंदा आठ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. 7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची (Sharadiya Navratri) सुरूवात होणार आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. यंदा दसरा (Dussehra 2021) 15 ऑक्टोबर दिवशी आहे. आश्विन महिन्यात शेतकर्याने शेतात घेतलेली मेहनत धान्यांच्या रूपात घरात येते म्हणून निसर्गातील निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती असल्याने नवरात्रीमध्ये तिचं पूजन केले जाते. नक्की वाचा: नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते? जाणून त्याचं महत्त्व आणि खास मंत्र!
‘नऊ‘ हा सर्वात मोठा अंक आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो. पण यंदा आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने आठ दिवसांची नवरात्र असेल. आठव्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन असणार आहे. Navratri Virtual Celebration Ideas: कोविड-19 संकटात यंदा व्हर्च्युअल माध्यमातून साजरा करा नवरात्रोत्सव; पहा सेलिब्रेशनच्या विविध आयडियाज.
नवरात्रोत्सव 2021 तारखा आणि तिथी
- नवरात्रीचा पहिला दिवस - 7 ऑक्टोबर - प्रतिपदा
- नवरात्रीचा दुसरा दिवस - 8 ऑक्टोबर - द्वितिया
- नवरात्रीचा तिसरा दिवस - 9 ऑक्टोबर - तृतीया/चतुर्थी
- नवरात्रीचा चौथा दिवस - 10 ऑक्टोबर - पंचमी
- नवरात्रीचा पाचवा दिवस - 11 ऑक्टोबर - षष्ठी
- नवरात्रीचा सहावा दिवस - 12 ऑक्टोबर - सप्तमी
- नवरात्रीचा सातवा दिवस - 13 ऑक्टोबर - अष्टमी
- नवरात्रीचा आठवा दिवस -14 ऑक्टोबर - नवमी
- नवरात्रीचा नववा दिवस - 15 ऑक्टोबर - दसरा
हिंदू धर्मीय शारादीय नवरात्री प्रमाणेच चैत्र नवरात्र, गुप्त नवरात्र मध्ये देखील देवींच्या विविध रूपांची आराधना करतात. अशी मान्यता आहे की नवरात्रीमध्ये आदिशक्ती देवलोकामधून पृथ्वीलोकावर येते आणि तिच्या भक्तांच्या कष्टांना दूर करते. नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा असतो तर सांगता दसर्याला दहाव्या दिवशी केली जाते. कुलाचारानुसार प्रत्येक ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण हा सण आदिशक्तीच्या पुजनाचा आहे. दुर्गा मातेच्या नऊ रूपांची नऊ दिवशी पूजा केली जाते.