Nag Panchami 2020 Messages: नागपंचमी सणानिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा श्रावणातील पहिलावहिला सण!
श्रावणातील नागपंचमी या पहिल्यावहिल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करा...
Nag Panchami 2020 Marathi Messages: श्रावण शुद्ध पंचमीला 'नागपंचमी' असे म्हणतात. या दिवशी नागाची पूजा केली जाते. जिवंत नागाची पूजा करणे शक्य नसल्याने नागाच्या मातीच्या मुर्तीची, प्रतिमेची पूजा करतात. हळद-कुंकू लावून, लाह्या-दूध वाहून नागांची पूजा केली जाते. नागपंचमी निमित्त नागांची पूजा ही देशात अनेक ठिकाणी केली जाते. तर काही ठिकाणी नागांचे अवतार मानल्या जाणाऱ्या पुरुषांची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीत सर्व उपयुक्त गोष्टींची पूजा करण्याची परंपरा आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीचे नुकसान करणारे उंदीर खावून साप हा शेतकऱ्यांची मदत करत असतो. त्यामुळे साप, नागाच्या पूजेची प्रथा आपल्याकडे सुरु झाली असावी. तसंच पर्यावरण संवर्धासाठी नागांचे जतन करणे आवश्यक आहे. ही शिकवण देखील या सणातून मिळते. त्यामुळे आपले सण किती अर्थपूर्ण आहेत. हे यावरुन स्पष्ट होते. यंदा नागपंचमीचा सण शनिवार, 25 जुलै रोजी आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाईल. (Nag Panchami 2020 Jokes: नागपंचमी निमित्त मराठी जोक्स, Funny Messages आणि Wishes शेअर करुन द्या सणाच्या शुभेच्छा!)
नागपंचमीबद्दल पुष्कळ कथा आहेत. एक म्हणजे श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नागाचा पराभव केला आणि तो यमुनेच्या डोहातून सुखरुप बाहेर पडला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता, असे मानले जाते. तर यंदा श्रावणातील हा पहिल्यावहिल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करा. (Naag Panchami 2020 Mehendi Designs: नाग पंचमी निमित्त सोप्प्या आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्स हातावर काढून साजरा करा सण)
नागपंचमी सणाच्या शुभेच्छा!
दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला|
नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!
नागांचे रक्षण करु,
हीच खरी नागपंचमी!
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया अपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी
नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
पूर्वी नागपंचमी सणानिमित्त स्त्रियांना विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरी नेण्याची पद्धत होती. मग माहेरवाशिणी नागपंचमी निमित्त फेर धरुन गाणी गात, झिम्मा-फुगडीसारखे खेळ रंगत. तसंच भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी देखील नागपंचमी निमित्त महिला उपवास करतात.