Dahi Handi 2019: मुंबईमध्ये मानाच्या अनेक दहीहंडी रद्द मात्र दादर, ठाणे परिसरात 'या' दहीहंडी नक्की पहायला मिळणार
त्यामुळे गोविंदा पथकांसह सामान्यांचा देखील हिरमोड झाला आहे. मात्र दही हंडीचा (Dahi Handi) सण रद्द करून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. मोठ्या दही हंड्यांचं आयोजन रद्द झालं असलं तरीही छोट्या दहीहंड्यांवर यंदा सार्यांचीच मदार आहे.
Mumbai, Thane Dahi Handi 2019 Celebrations: महाराष्टामध्ये जन्माष्टमीच्या (Janmashtami) रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसर्या दिवशी गोपाळकाला हा सण मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) शहरामध्ये दहीहंडी फोडून हा सण साजरा केला जातो. यंदा वरळीमधील सचिन अहीर (Sachin Ahir), राम कदम (Ram Kadam) यांची भव्य स्वरूपातील दही हंडीचा सण रद्द झाला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांसह सामान्यांचा देखील हिरमोड झाला आहे. मात्र दही हंडीचा (Dahi Handi) सण रद्द करून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. मोठ्या दही हंड्यांचं आयोजन रद्द झालं असलं तरीही छोट्या दहीहंड्यांवर यंदा सार्यांचीच मदार आहे. मग पहा यंदा दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी तुम्हांला मुंबई आणि ठाणे परिसरात कुठे दहीहंडीचा खेळ पाहता येईल. जगातील सर्वात उंच दहीहंडीचा जागतिक विक्रम आहे मुंबईच्या 'या' पथकाच्या नावे; स्पेन आणि चीनलाही टाकले मागे
मुंबई, ठाण्यात यंदा कुठे पहाल दहीहंडीचा खेळ?
आयडिअल गल्ली, दादर
आयडियल बुक स्टोअरच्या गल्लीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्सहात दहीहंडी साजरी केली जाते. यामध्ये यंदाही पुरूषांसोबत महिला गोविंदा पथक सहभाग घेणार आहेत. इको फ्रेंडली पद्धती साजरी केली जाणारी आयडियल गल्लीमधील दहीहंडी यंदा नक्की पहायला मिळेल. Dahi Handi 2019: नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकांचे काय होणार? नक्की वाचा
अविनाश जाधव यांची दहीहंडी
ठाण्यामध्ये मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी यंदा मनसे दहीहंडीचं आयोजन केले आहे. छोट्या स्वरूपात यंदा हा सण साजरा केला जाणार आहे. नौपाडा मध्ये मनसे कडून खास दहीहंडीचं आयोजन केले आहे.
ठाणे दहीहंडी
ठाण्यामध्ये दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. पण यंदा हा उत्साव थोडा कमी स्वरूपात असेल. टेंभीनाका, वर्तक नगर, संकल्प प्रतिष्ठान, समर्थ प्रतिष्ठान यंदा पारंपारिक स्वरूपात सण साजरा करणार आहेत. दही हंडी निमित्त डॉ. काशिनाथ नाट्यगृह चौकातील वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
संस्कृती युवा प्रतिष्ठान
शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान कडून यंदा दहीहंडीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र त्याचे स्वरूप सौम्य असेल. यंदा साधेपणाने हा सण साजरा केला जाईल.
मुंबई, ठाण्यात दही हंडीचं भव्य स्वरूप कमी झालं असलं तरीही यंदा पारंपारिक स्वरूपात खेळला जाणारा सण कायम असल्याने तुम्ही त्याचा आनंद नक्कीच लुटू शकता. तर दहीहंडीचा खेळ साजरा करताना नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी गोविंदा पथकांनाही घ्यायची आहे.
यंदा छोट्या स्वरूपातही जरी सण खेळला गेला तरीही त्यामधून मिळाली रक्कम अनेक गोविंदा पथक पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.