Mumbai Cha Peshwa 2026: 'मुंबईचा पेशवा' संपूर्ण हवेत असलेल्या मूर्तीचं रूप पाहून भक्त थक्क; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

मुंबईचा पेशवा 2026 ची ही बॅलेन्सिग मूर्ती ईको फ्रेंडली आहे. कागद्याच्या लगद्यापासून तिची निर्मिती करण्यात आली आहे. 'मुंबईचा पेशवा' हे मंडळ विलेपार्ले पूर्व येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाद्वारे चालवले जाते.

Mumbai Cha Peshwa 2026 balancing idol

मुंबई मध्ये आज अनेक मोठ्या गणपती मंडळांचे बाप्पा आपल्या मंडळात रवाना होत आहेत. लालबाग-परळ भागाममध्ये बाप्पाची अनेक विलोभनीय रूप सध्या पहायला मिळत आहेत. तरूणाईमध्ये क्रेझ असलेला चिंचपोकळीचा चिंतामणी देखील आज मंडपात रवाना झाला आहे. दरम्यान सोशल मीडीयात आज अजून एका बाप्पाचं रूप गणेशभक्तांना थक्क करत आहे ते म्हणजे 'मुंबईचा पेशवा'. विलेपार्लेतील हा बाप्पा आज मंडपाकडे रवाना त्याची संपूर्ण हवेत असलेली मूर्ती भाविकांना विलक्षण सुख देत आहे. अनेकांनी अदभूत करणारा हा नजारा सोशल मीडीयात शेअर केला आहे.

बॅलेन्सिंग मूर्ती आणि इतर सर्जनशील संकल्पनांसाठी 'मुंबईचा पेशवा' मंडळ यापूर्वीही चर्चेत राहिले आहे. यंदाच्या मूर्तीने पुन्हा एकदा ही परंपरा कायम राखत भाविकांचे आणि कला रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंडळांकडून सादर होणाऱ्या नाविन्यपूर्ण मूर्तींच्या मालिकेत या मूर्तीने आणखी एक भर घातली आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2026 Dates: यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारण.  

सोशल मीडीयात 'मुंबईचा पेशवा'ची चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝙑𝙚𝙙𝙖𝙣𝙩 𝙅𝙖𝙙𝙝𝙖𝙫 🌟 (@explorewith_vedanttt)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by bappa_chi_nagri (@bappa_chi_nagri)

 

View this post on Instagram

 

A post shared by SHREE  | INDIA 🇮🇳 (@clicks_by_shree)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝒑𝒓𝒂𝒏𝒂𝒚 𝒂𝒔𝒉𝒐𝒌 𝒕𝒉𝒂𝒌𝒖𝒓 📸🌻 (@pranay__thakur19)

इको फ्रेंडली मूर्ती

मुंबईचा पेशवा 2026 ची ही  बॅलेन्सिग मूर्ती ईको फ्रेंडली आहे. कागद्याच्या लगद्यापासून तिची निर्मिती करण्यात आली आहे.  आज संध्याकाळी 5 च्या सुमारास पार्लेश्वर मंदिर, विलेपार्ले (पूर्व) येथे आगमन होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

'मुंबईचा पेशवा' हे मंडळ विलेपार्ले पूर्व येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाद्वारे चालवले जाते. सन १९८९ मध्ये स्थापन झालेले हे मंडळ पेपर आणि टिश्यू पेपरपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींसाठी विशेष ओळखले जाते. दरवर्षी या मंडळाकडून सादर केल्या जाणाऱ्या अनोख्या आणि कल्पक मूर्तींमुळे हे मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक बनले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement