Matru Din 2026 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा Quotes, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करत आईला द्या गोड सरप्राईज!
यंदाच्या मातृदिनी आपल्या आईला आणि आयुष्यातील प्रत्येक मातृशक्तीला धन्यवाद देऊन तिच्या आशीर्वादाने आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचा जावो, अशी सदिच्छा व्यक्त करूया.
भारतीय संस्कृतीत आईच्या त्यागाला आणि तिच्या अपत्यप्रेमाला विशेष स्थान आहे. याच भावनेचे प्रतीक असलेला पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) हा सण यंदा 10 सप्टेंबर 2026, गुरुवारी साजरा होत आहे. श्रावण महिन्यातील अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला मातृदिन (Matru Din) साजरा करण्याची पद्धत आहे. याच दिवशी माता आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. मग आईसाठी तुम्ही देखील हा दिवस खास करू शकता. आईप्रति कृतज्ञता व्यक्त करत तिच्या दिवसाची सुरूवात स्पेशल करण्यासाठी मातृदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Facebook Messages, Images द्वारा शेअर करत हा आनंद द्विगुणित करू शकता.
पिठोरी अमावस्या हे व्रत केवळ धार्मिक विधी नसून आई आणि मूल यांच्यातील नात्याचा उत्सव आहे. या दिवशी माता स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठी उपवास करतात आणि देवी पिठोरी व ६४ योगिनींची पूजा करतात. यामुळेच पाश्चिमात्य 'मदर्स डे'च्या धर्तीवर हा दिवस भारतीय परंपरेतील मातृदिन मानला जातो.
मातृदिनाच्या शुभेच्छा
पिठोरी अमावस्येच्या दिवशी अनेक कुटुंबांत आई आपल्या मुलांसाठी दिवसभर उपवास करते. त्यामुळे या दिवशी शुभेच्छा संदेश पाठवण्यासोबतच आईसोबत वेळ घालवणे, तिच्या पूजाविधीत सहभागी होणे आणि तिच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे, हेच या सणाचे खरे सार आहे.
या मातृदिनी आपल्या आईला आणि आयुष्यातील प्रत्येक मातृशक्तीला धन्यवाद देऊन तिच्या आशीर्वादाने आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचा जावो, अशी सदिच्छा व्यक्त करूया.